Ranveer Singh nude photoshoot Instagram
मनोरंजन

Ranveer Singh Bold Photoshoot: रणवीरचा जवाब नोंदवला!, दोन तास चौकशी

बोल्ड फोटोशुट प्रकरणी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर देखील त्याच्या (Bollywood Actor Ranveer Singh) त्या न्युड फोटोची चर्चा होती.

युगंधर ताजणे , जीवन तांबे

Ranveer Singh Photoshot : अभिनेता रणवीर सिंग याने नुकतेच एका मासिकाच्या कव्हरसाठी बोल्ड फोटोशूट केला असल्याच्या विरोधात चेंबूर येथील एका संस्थेने चेंबूर पोलीस ठाण्यात २५ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्याला आज सोमवारी (ता.२९) चौकशी करिता बोलविण्यात आले. तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली.

रणवीर सिंग (Ranveer Singh) याने इंस्टाग्रामवर व ट्विटर अकाऊंटवर त्याचे बोल्ड फोटो शेअर केले होते. रणवीर याने तरुण वर्गास नीतीभ्रष्ट करण्याचा व समाज बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. यामुळे समाजातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लज्जा निर्माण झाल्याचा आरोप चेंबूर येथील एका संस्थेने रणवीर सिंग याच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात २५ जुलै रोजी गुन्हा नोंद केला होता.

त्यानुसार त्याला २२ ऑगस्ट रोजी चौकशी करीता हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्याने मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार चौकशी करिता आज सोमवारी २९ ऑगस्ट रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात सकाळी ठीक ७ ते ९ वाजण्याच्या सुमारास येऊन (Bollywood News) आपले दोन तास जबाब नोंदविला. पुन्हा गरज लागल्यास रणवीरला बोलविण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT