Ranveer Singh Photoshoot Ranveer Singh Photoshoot
मनोरंजन

रणवीरविरोधात कोलकाता न्यायालयात याचिका; मासिकाच्या प्रती जप्त करण्याचे आवाहन

मुंबईतील चेंबूरमध्ये एका एनजीओने रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh Photoshoot बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा न्यूड फोटोशूट केल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीला त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले आणि मीम्स बनवले गेले. यानंतर अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या. आता याच क्रमाने त्याच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे.

न्यूड फोटोशूट (Photoshoot) केल्यामुळे सतत चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून याचिकाकर्त्याने फोटोशूट पश्चिम बंगाल सरकार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर सर्व प्राधिकरणांना पाठवण्याची विनंती केली आहे. तसेच मासिकाच्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे आदेश देण्याचे म्हटले आहे.

वकील नाझिया इलाही खान यांनी रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल करताना जनतेच्या मोठ्या वर्गाच्या मताच्या आधारे ही छायाचित्रे अश्लील असल्याचे म्हटले आहे. याशिवाय बाजीराव मस्तानी स्टार रणवीर सिंगच्या फोटोशूटने पश्चिम बंगालमधील जनतेचे मन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या दिशेने ढकलले आहे. विशेषत: अल्पवयीन मुलांचे, असा दावाही याचिकेत (Petition) करण्यात आला आहे.

एनजीओने मुंबईत पोलिसात तक्रार दाखल केली होती

याआधी मुंबईतील चेंबूरमध्ये एका एनजीओने रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनीही रणवीरविरोधात एफआयआर नोंदवला होता. कामाबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी’ आणि ‘रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT