Ranveer Singh reveals once a bollywood producer set his dog loose on him at party  Google
मनोरंजन

Ranveer Singh: बड्या निर्मात्याचं रणवीरसोबत लज्जास्पद कृत्य; म्हणाला, 'कुत्रा अंगावर सोडत...'

स्ट्रगल काळात आपण काय काय सहन केलंय याचा पाढाच रणवीर सिंगनं एका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये वाचला आहे.

प्रणाली मोरे

Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंगने २०१० मध्ये 'बॅंड बाजा बारात' सिनेमातून पदार्पण केलं होतं. गेल्या १२ वर्षात रणवीरनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आज रणवीर सिंगला बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांमध्ये धरलं जातं जे सगळ्यात जास्त कमाई करतात. पण याआधी म्हणजे त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांत परिस्थिती वेगळी होती. एकदा तर असे झाले होते की बॉलीवूडच्या एका बड्या निर्मात्यानं रणवीरच्या अंगावर आपल्या कुत्र्याला सोडलं होतं.(Ranveer Singh reveals once a bollywood producer set his dog loose on him at party)

रणवीर सिंग काही दिवसांपूर्वी Marrakech International Film Festival मध्ये उपस्थित राहिला होता. जिथे त्याला Etoile d'Or अवॉर्डनं सम्मानित केलं गेलं होतं. त्या फेस्टिव्हलमध्ये मुलाखतीच्या दरम्यान त्याने बॉलीवूडमधील आपल्या प्रवासाविषयी सांगताना अनेक खुलासे केले.

रणवीर सिंगने सिनेइंडस्ट्रीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल विषयी काही आठवणी शेअर करताना सांगितलं की एका बड्या निर्मात्यानं एका पार्टीत केवळ मजा म्हणून माझ्या पाठी त्याचा कुत्रा सोडला होता. रणवीर पुढे म्हणाला,''आता तो निर्माता हयात नाही''.

रणवीर म्हणाला,''त्या निर्मात्यानं मला पार्टीत बोलावलं''. रणवीरनं पूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख केला. पण निर्मात्याचं नाव सांगण्यास मात्र त्यानं नकार दिला. त्याच मुलाखतीत रणवीरनं आपल्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचचा अनुभवही शेअर केला. तो म्हणाला,''त्या माणसानं मला एके ठिकाणी बोलावलं. मला विचारलं तू हार्ड वर्कर आहेस की स्मार्ट वर्कर? आता मी स्वतःला काही स्मार्ट समजत नाही म्हणून मी हार्ड वर्कर आहे असं म्हणालो. तेव्हा तो म्हणाला, डार्लिंग..स्मार्ट बन..सेक्सी बन. करिअरच्या पहिल्या साडे तीन वर्षात मी नको-नको ते झेललं आहे. त्यामुळे मला ज्या काही संधी मिळाल्या त्या मला खूप मोलाच्या वाटतात ते याच कारणानं''.

रणवीर सिंगनं 'बॅंड बाजा बारात' या त्याच्या सिनेमासाठी बेस्ट डेब्यू चा पुरस्कार मिळवला होता. त्यानं यानंतर एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. यावर्षी तो 'जयेशभाई जोरदार' मध्ये दिसला होता. पुढील वर्षी २०२३ मध्ये त्याचा 'सर्कस' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे दोन सिनेमे आपल्या भेटीस येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT