rashmi rocket editor ajay sharma  Team esakal
मनोरंजन

Rashmi Rocket चे एडिटर अजय शर्मांचे कोरोनाने निधन

अजय (Ajay Sharma) यांना कोरोनाची लागण झाली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींचाही समावेश आहे. काल अभिनेत्री निक्की तांबोळीच्या भावाचे कोरोनानं निधन झाले. प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोणचे आई वडिल कोरोनामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. अनेक कलाकार घरातच क्वारंनटाईन झाले आहेत. Rashmi Rocket या चित्रपटाचे एडिटर अजय शर्मा (Ajay Sharma) यांचे कोरोनानं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

अजय (Ajay Sharma) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. त्यांना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी श्रध्दांजली वाहिली आहे. प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नुची आगामी फिल्म रश्मि रॉकेट या चित्रपटाचे एडिटर आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी श्रेया पिळगांवकरनं दिली आहे. तिनं शर्मा यांना श्रध्दांजली वाहताना लिहिलं आहे की, आम्ही अजय शर्मा य़ांना गमावले आहे.

अजय (Ajay Sharma) यांच्या रुपानं एक जिनिअस कलाकार आपपल्यातून गेला आहे. ते केवळ कल्पक एडिटरच नव्हते तर एक चांगले व्यक्तिमत्वही होते. आम्हाला काहीच समजत नाहीये. टीएस सुरेश यांनी लिहिलं आहे की, जीवन हे फार अनिश्चित झाले आहे. त्याचा काहीच भरवसा राहिला नाही. आम्ही एका अतिशय टँलेटेड व्यक्तीला गमावले आहे. याकाळात आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दु;खात सहभागी आहोत.

अजय (Ajay Sharma) यांनी जग्गा जासूस, कारवा, लुडो, इंदू की जवानी, हायजॅक, प्यार का पंचनामा २, क्रुक, तुम मिले याशिवाय बंदिश बँडिट्स, ये जवानी है दिवानी, अग्निपथ, काय पोचे, लाइफ इन मेट्रो, गोरी तेरे प्यार में, आय हेट लव सारख्या चित्रपटांचे एडिटिंग केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT