Rashmika Mandana Video  
मनोरंजन

Rashmika Mandana Video : 'श्रीवल्ली' कसली भारीये, फोटोला नाही म्हटली नाही!

रश्मिकाला विमानतळावर चाहत्यांच्या मोठ्या गर्दीला सामोरं जावं लागलं आहे. त्या गर्दीतून वाट काढणं तिला अवघड होऊन बसलं.

युगंधर ताजणे

Rashmika Mandana National Crush Actress Stuck : रश्मिका ही आता काही साधीसुधी अभिनेत्री राहिलेली नाही. ती नॅशनल क्रश अभिनेत्री झाली आहे. पुष्पा द राईज या चित्रपटातून बॉलीवूडच्या प्रेक्षकांना रश्मिकाची ओळख झाली. त्यानंतर दिवसेंदिवस तिची लोकप्रिता वाढत गेली. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून रश्मिका दिसणार आहे. Rashmika Mandana National Crush Actress

सध्या सोशल मीडियावर रश्मिकाचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो मुंबई विमानतळावरील आहे. रश्मिकाला विमानतळावर चाहत्यांच्या मोठ्या गर्दीला सामोरं जावं लागलं आहे. त्या गर्दीतून वाट काढणं तिला अवघड होऊन बसलं. यामुळे की काय काही वेळ का होईना तिला चाहत्यांचे ऐकावे लागले. आणि त्यांना सेल्फीसाठी पोझ द्यावी लागली. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गर्दीमध्ये रश्मिका अडकून बसली....

विमानतळावर रश्मिका येणार असल्याचे कळताच विमानतळाबाहेर मोठी गर्दी झाली. प्रत्येकाला नॅशनल क्रश रश्मिकाला पाहण्याची इच्छा होती. काहींनी तिच्यासोबत सेल्फीही घ्यायचा होता. यासगळ्याचा रश्मिकाला मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिला बराचवेळ विमानतळावर बसून राहावे लागले. फॅन्सची वाढणारी गर्दी यामुळे तिच्या सुरक्षारक्षकांना देखील मोठी कसरत करावी लागत होती. अखेर त्यांनी मोठया प्रयत्नानं रश्मिकाला त्या गर्दीतून बाहेर काढल्याचे दिसून आले.

रश्मिकाचे आगामी प्रोजेक्ट माहिती आहे का?

रश्मिकाच्या आगामी प्रोजेक्ट विषयी सांगायचे झाल्यास, तिच्याकडे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटाची मोठी लिस्ट आहे. बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींसोबत ती स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे. सध्या तिच्या रेनबो नावाच्या चित्रपटाची शुटींग सुरु आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदा समंथा होती. त्यानंतर तिची जागा रश्मिकानं घेतली.

याशिवाय रश्मिका ही बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसोबत अॅनिमल नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. ब्रम्हास्त्रनंतर रणबीरचा हा आणखी एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट अकरा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच रश्मिका ही पुष्पा द रुलमध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT