rashmika mandana Rashmika Mandana
मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिकाचा होता फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) वाट्याला पुष्पानंतर मोठी लोकप्रियता आली.

सकाळ डिजिटल टीम

Tollywood News: दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) वाट्याला पुष्पानंतर मोठी लोकप्रियता आली. सध्या ती प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिचं सामी आणि श्रीवल्ली गाणं सोशल मीडियावर (Saami Song) प्रचंड लोकप्रिय झाले आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर (Pushpa Box Office) कमाल केली आहे. रश्मिकाची वेगळी ओळख करुन द्यायची झाल्यास ती सध्याच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. पुष्पानंतर तिची गाडी सुसाट सुटली आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. तिनं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामध्ये आपण पहिल्याच चित्रपटानंतर ते क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतल्याचे रश्मिकानं सांगितलं आहे.

सध्या रश्मिकाकडे अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. त्यामुळे येत्या काळात तिच्या प्रोजेक्टची उत्सुकता चाहत्यांना आहे. एका प्रसंगानंतर रश्मिकाच्या आयुष्यात बदल झाला. दाक्षिणात्य चित्रपटातील काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून आपल्याला अपमानस्पद वागणूक मिळाल्याचे रश्मिकानं सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं की, मी टॉलीवूड कायमचे सोडणार होते. एवढा मानसिक त्रास मला झाला होता. माझ्या वडिलांनी मला त्यांचा बिझनेस पाहण्यासाठी सांगितले. एकीकडे मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि दुसरीकडे घरुन बिझनेसच्या क्षेत्रात येण्यासाठी होणारा आग्रह यामुळे माझी मानसिकता काही काळ ढासळल्याचेही रश्मिकानं सांगितलं.

मी वयाच्या 19 व्या वर्षी काम सुरु केले होते. या वयात मुली त्यांचं आयुष्य इंजॉय करताना दिसतात. मी मात्र कामात होते. दिवसरात्र मेहनत करत होते. मला खूप धमाल करायची होती. मात्र त्यावेळी कामाच्या ओझ्यानं माझा तो आनंद हिरावून घेतला. ठीक आहे आता मला त्याचे वाईट वाटत नाही. आज मी जे काही आहे ते सगळ्या त्या दिवसांमधील कष्टाचे फळ असल्याची प्रतिक्रिया रश्मिकानं दिली आहे. तेव्हा मला वडिलांनी सांगितले होते की, एकच चित्रपट करायचा आणि पुन्हा ते क्षेत्र सोडून द्यायचे. त्यांचा हा निर्णय ऐकून मला तर धक्काच बसला होता. अशी आठवण रश्मिकानं यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT