Rashmika Mandana selfie from maldives with rumoured boyfriend vijay deverakonda Instagram
मनोरंजन

Rashmika Mandana: मालदिवहून रश्मिकानं शेअर केला फोटो; चाहते त्या फोटोला झूम करून शोधू लागलेयत...

'गूडबाय' सिनेमाच्या रीलिजनंतर रश्मिका सध्या मालदिवमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

प्रणाली मोरे

Rashmika Mandana: दक्षिणेची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या दोन कारणांमुळे मोठी चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. पहिलं कारण तर तिनं 'गूडबाय' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे,गेल्या काही दिवसांपासून ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. तर दुसरं कारण की सध्या मालदिवमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. आता एकटी गेली असती तर एवढी चर्चा झाली असती की नाही यात शंकाच वाटतेय पण आता अंदाज लावले जात आहेत की ती विजय देवरकोंडासोबत खास क्षण एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

आता विजय आणि तिच्यात काही तरी सुरु आहे ही अफवाच आहे असं सध्या तरी कळतंय. पण तरीदेखील विजय तिच्यासोबत मालदिवला गेला आहे की नाही हे जाणून घेण्यात चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे. तिनं मालदिवहून आपला तिथं काढलेला एक सेल्फी फोटो शेअर केला आहे जो भलताच व्हायरल झाला आहे.

रश्मिका मंदानानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या सभोवताली अथांग नीळ्या रंगाचा मालदिवचा समुद्र पसरलेला दिसतोय आणि स्वच्छ निरभ्र आकाशाचं आरसपानी सौंदर्यही फोटोतून डोकावत आहे. हा फोटो हॉटेलच्या रुममधनं काढला आहे. जिथे ती सध्या राहतेय. या फोटोला पोस्ट करत तिनं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे,'Hi Loves..' यामुळे मात्र शंका दाट होतेय.

Rashmika Mandana selfie from maldives

रश्मिकानं जसा फोटो शेअर केला तसे लोक त्या फोटोला झूम करून पाहू लागले,आणि त्या फोटोत 'लाइगर' अभिनेता विजय देवरकोंडाला शोधू लागले. आता फोटो कितीही झूम करुन पाहिला तरी रश्मिकाच्या पाठमोऱ्या काचेत फोटो काढणारा काही केल्या दिसत नाहीय.

बोललं जात आहे की रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत,पण दोघांनीही या नात्यावर मौन साधलं आहे. विजय जेव्हा करण जोहरच्या चॅट शो मध्ये गेला होता तेव्हा त्यानं त्याला रीलेशनशीप स्टेटसविषयी अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण विजयनं त्याला मोठ्या शिताफिनं टाळलं आणि काही केल्या तोंड उघडलं नाही.

रश्मिका आणि विजयनं 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला लोकांनी खूप पसंतही केलं होतं. आणि तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी शिजतंय याचा अंदाज लोक वर्तवू लागले.

रश्मिका आणि विजयच्या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर विजय नुकताच 'लाइगर' मध्ये दिसला होता. करण जोहरच्या या सिनेमाच्या माध्यमातून त्यानं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती, पण सिनेमा बॉक्सऑफिसवर तोंडावर आपटला. तर रश्मिकानं अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत बॉलीवूडमध्ये 'गूडबाय' सिनेमातून पदार्पण केलं. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. समिक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया सिनेमाला मिळत आहेत. पण पहिल्या दिवशीच प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवलेली दिसली. रश्मिका या व्यतिरिक्त रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' सिनेमातही दिसणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' मध्ये ती काम करत आहे. विजयही समंथासोबत 'खुशी' सिनेमात काम करतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT