Rashmika Mandana: रश्मिका मंदाना दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांपेक्षा अधिक नेहमीच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली दिसून येते. लोक तिच्या एका स्माईलवर जीव ओवाळून टाकताना दिसतात. सध्या रश्मिका आपल्या नव्या बॉलीवूडच्या सिनेमामुळे चर्चेत पहायला मिळतेय. याच सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं गेली असताना रश्मिकानं काही पर्सनल गोष्टी देखील शेअर केल्या आहेत.
ती अजूनही आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भेटते,त्यासाठी काही कारणच असावं असं नाही असं सांगतानाच आमच्यात अजूनही चांगलं नातं आहे असं म्हणून गेली रश्मिका. आणि बस्स चर्चेला उधाण आलं. याचवेळी रश्मिका म्हणाली,''प्रेमाचं नातं तुटल्यानंतरही आमच्यात मैत्रीचं नातं इतकं चांगलं टिकून राहिलंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही''.(Rashmika Mandana Still meets Ex-boyfriend, actress said, it is not right but...)
रश्मिका लवकरच 'गूडबाय' या सिनेमातून बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करतेय. रश्मिकाला या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत विचारलं गेलं की,'जर एखाद्या पार्टीत तुला तुझा जुना बॉयफ्रेंड भेटला तर तुझी रिअॅक्शन काय असेल?' तेव्हा तिनं 'नमस्ते' असं उत्तर दिलं. पुढे ती म्हणाली,''माझ्या एक्ससोबत माझी अजूनही चांगली मैत्री आहे. मी त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांना भेटणंही पसंत करते''. एवढ्यावरच रश्मिका थांबली नाही तर तिनं हे स्विकारलं की,''खरंतर त्याचं लग्न झाल्यानंतर मी त्याला भेटणं ही चांगली गोष्ट नाही पण आमच्यात मैत्रीचं खूप चांगलं नातं आहे, पण मग हे देखील चांगलंच आहे नाही का''.
रश्मिकानं रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. जेव्हा तिनं 'किरिक' या आपल्या पहिल्या सिनेमात त्याच्यासोबत काम केलं होतं,तेव्हापासून ते दोघे एकमेकांना डेट करायला लागले. ही गोष्ट २०१६ सालातली. त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा देखील उरकला,पण २०१८ च्या सप्टेंबरमध्ये दोघांनी आपला साखरपुडा तोडला. आणि त्यानंतर रश्मिकाचं नाव अनेकदा विजय देवरकोंडासोबत जोडलं गेलं. रश्मिका आणि विजयने २०१८ मध्ये 'गीता गोविंदम'मध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर २०१९ मध्ये 'डियर कॉमरेड' सिनेमात ते एकत्र दिसले. पण दोघांनीही कधीच आपल्यातील नात्याचा स्विकार केला नाही.
रश्मिकानं काही दिवसांपूर्वीच आपल्या एका मुलाखतीत विजयसोबतच्या नात्यावरुन उठणाऱ्या अफवांवर बोलत म्हटलं,''कधी कधी या अफवा गोड वाटतात. मी आणि विजयनं एकत्र काम केलं आहे. आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या मनात आलंही नव्हतं असं काही आमच्याविषयी बोललं जाईल. फक्त आम्ही चांगले मित्र बनलो,ट्युनिंग जमलं,पडद्यावर चांगले दिसलो आणि आमच्याही नकळत लोकांनी ठरवून टाकलं. पण ठीक आहे, रश्मिका आणि विजय हे नाव जोडलं जातंय, चांगलं आहे''.
'गुडबाय' सिनेमात रश्मिकानं अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमात सुनील ग्रोव्हर, पावेल गुलाटी,नीना गुप्ता असे कलाकार आहेत. हा सिनेमा ७ ऑक्टोबरला रिलीज होत आहे. रश्मिकाचे आणखी दोन हिंदी सिनेमे आपल्या भेटीस येत आहेत. यात रणबीर कपूरसोबतचा 'अॅनिमल' आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबतचा 'मिशन मजनू'. रश्मिका अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा- द रूल' मध्ये देखील श्रीवल्लीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.