Raveena Tandon Instagram
मनोरंजन

Raveena Tandon First Salary: फक्त इतकेच रुपये होती रवीनाची पहिली कमाई.. अनेक वर्षांनी केला खुलासा

कपिल शर्मा शो मध्ये मदर्ड डे निमित्तानं रवीना टंडन आली होती तेव्हा तिनं आपल्या पहिल्या सॅलरीचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Raveena Tandon गेल्या ३२ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहे. आज तिचं नाव बॉलीवूडमध्ये अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सामिल आहे. एका सिनेमात काम करायला करोडो रुपये मानधन आकारते रवीना. पण तुम्हाला माहित आहे का की तिची पहिली कमाई किती होती. यासंदर्भात रवीनानं अनेक वर्षांनी खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच रवीना टंडन कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती. 'मदर्स डे' च्या स्पेशल एपिसोडमध्ये रवीना दिसली होती. तिच्यासोबत त्या भागात सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि ऑस्कर विनिंग निर्मात्या गुनित मोंगा देखील सामिल झाल्या होत्या. आता हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कपिलच्या शो मध्ये कुणी स्टार आला की कोणता ना कोणता खुलासा होतोच. (Raveena Tandon First Salary)

कपिलनं या तिघींनाही विविध प्रश्न विचारले. त्यादरम्यान रवीना टंडननं आपल्या पहिल्या कमाईचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की,''तिची पहिली सॅलरी ५०० ते ६०० रुपये होती,जी तिला एका जाहिरातीत काम केल्यानंतर मिळाली होती''.

रवीना टंडन पुढे म्हणाली की,''तिच्या आईजवळ एक टेपरेकॉर्डर होता,ज्यावर ते लोक सकाळी गाणी ऐकायचे. तो खूप जुना झाला होता. त्यामुळे रवीनानं आपल्या पहिल्या ५०० रुपयाच्या कमाईतून आईसाठी नवीन टेप रेकॉर्डर खरेदी केला होता''.

शो ची परिक्षक अर्चना पुराण सिंगनं यादरम्यान कपिलकडे त्याच्या पहिल्या कमाईविषयी विचारलं. तेव्हा तो म्हणाला,''तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझी पहिली कमाई ५०० रुपये इतकीच होती. आणि त्यानंही त्यातून टेप रेकॉर्डर खरेदी केला होता''.

तो म्हणाला की,''त्याला देखील जुनी गाणी आवडायची पण त्याला तो टेप रेकॉर्डर खरेदी करण्यासाठी आपल्या वडीलांकडे पैसे मागायचे नव्हते. तेव्हा त्यानं स्वतः पैसे कमावल्यानंतर तो टेप रेकॉर्डर खरेदी केला होता''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT