The Love Life Of Rekha  esakal
मनोरंजन

The Love Life Of Rekha : 400 चित्रपट केले तरी 'त्या' चित्रपटातील 'तो' सीन रेखाला आवडतोच!

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नेहमीच चर्चेत असते.

सकाळ डिजिटल टीम

Rekha Bollywood Actress share the love life : कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिच्या फोटो आणि व्हिडिओसाठी ओळखली जाते. याचे कारण तिचे व्यक्तिमत्व. वयाची ६० वर्षे पार केल्यानंतरही रेखा लाईमलाईट असते.

सध्या सोशल मीडियावर रेखाचा एक जुना इंटरव्ह्यु व्हायरल झाला आहे. तो बीबीसीनं घेतला होता. त्यामध्ये रेखानं आपण चारशे हून अधिक चित्रपट केले. मात्र एका चित्रपटातील तो सीन अमुक अभिनत्येसोबत करतानाच्या आठवणी शेयर केल्या होत्या. ३७ वर्षांपूर्वी दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या परखड स्वभावाचा परिचय चाहत्यांना करुन दिला होता.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

बॉलीवूडमध्ये नेहमीच रेखाची तिचे अफेयर, तिचे वैयक्तिक आयुष्य यावरुन चर्चा होत असते. आताही त्या मुलाखतीनं परत तिला चर्चेत आणलं आहे. आपल्यापेक्षा वयानं वीस वर्षांहून कमी असणाऱ्या अभिनेत्यासोबतचे तिचे रिलेशन ही बॉलीवूडसाठी मोठी वादळी घटना होती. बॉलीवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखाचं अफेयर हे देखील अजुनही चाहत्यांच्या गॉसिपचं कारण असतं.

Rekha Bollywood Actress share the love life

रेखा ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. तिला कारण तिचा स्वभाव. आपण जे काही बोलू त्यावर ठाम राहू असा तिचा निर्धार तिला बाकीच्या अभिनेत्रींपेक्षा वेगळा ठरवतो. राखीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, भलेही आपल्याला उमराव जानसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असेल मात्र तिच्या मते तो काही तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय नव्हता.

तुझा आवडता चित्रपट कोणता त्यावर तिनं सांगितलं की, मला आतापर्यत माझा कोणताही चित्रपट पूर्णपणे आवडलेला नाही. मात्र मला १९७८ मध्ये आलेल्या त्या घर चित्रपटातील रेप सीन कमालीचा आवडला होता. मी आतापर्यत चारशे चित्रपट केले असतील. मात्र तो चित्रपट आपल्यासाठी खास होता. मला आनंद याचा आहे की, दिग्दर्शकानं ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या त्यासगळ्या मला त्या सीनमध्ये करता आल्या. मी त्यांना निराश केले नाही.

या मुलाखतीमध्ये रेखानं तिचं आवडतं गाणंही गायलं होतं. ‘मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे.’असे त्या गाण्याचे बोल होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी रेखानं चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि ती या क्षेत्राची प्रसिद्ध अभिनेत्री झाली. आजही तिची लोकप्रियता कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Shocking Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराचा ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नशेच्या गोळ्या दिल्या अन्...

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!

SCROLL FOR NEXT