remo d'souza 
मनोरंजन

रेमो डिसूजाची कशी आहे तब्येत? पत्नी लिजेलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिले अपडेट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला काही दिवसापूर्वी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रेमोच्या चाहत्यांमध्ये या बातमीमुळे काळजीचं वातावरण होतं मात्र आता चाहत्यांना लिजेलने रेमोचे हेल्थ अपडेट दिले आहेत. लिजेलने एक व्हिडिओ शेअर करत रेमोची तब्येत आता कशी आहे हे त्याच्या चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाला शुक्रवारी दुपारी जवळपास २.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. रेमोच्या हृदयातून ब्लॉकेजेस काढल्यानंतर त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. त्याची तब्येत आता स्थिर आहे आणि डॉक्टर त्याच्या तब्येतीच्या सुधारणेवर लक्ष ठेवून आहेत. रेमोचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात टाकणारा आहे. मात्र आता आणखी किती दिवस रेमो हॉस्पिटलमध्ये राहणार आणि  डॉक्टर त्याला डिस्चार्ज देणार हे महत्वाचं आहे. 

रेमोची पत्नी लिजेलने रेमोचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'पायाने डान्स करणं ही एक सामान्य गोष्ट आहे मात्र हृदयाने/मनाने डान्स करणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.' लिजेलच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. इतकंच नाही तर रेमो सर लवकर बरे व्हावेत अशा प्रार्थना देखील करत आहेत.

रेमो बॉलीवूडचा एक उत्तम कोरिओग्राफर आहे. सोबतंच त्याने दिग्दर्शनामध्येपण त्याचं नशीब आजमावलं आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये रिऍलिटी शोचा परिक्षक म्हणून तो दिसून आला होता.    

remo dsouza wife lizelle shares health update thankfull fans for prayers  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT