Rhea Chakraborty  
मनोरंजन

रिया चक्रवर्ती साकारणार 'द्रौपदी'?; बिग बजेट चित्रपटाची ऑफर

रुमी जाफरी देणार रियाला मोठी संधी

स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty लवकरच एका बिग बजेट चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा बिग बजेट चित्रपट महाभारत Mahabharat या पौराणिक कथेशी संबंधित असून यामध्ये बॉलिवूडमधील इतर मोठे कलाकारसुद्धा काम करणार आहेत. या चित्रपटात रिया द्रौपदीची Draupadi भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. (Rhea Chakraborty offered to play the role of Draupadi in a big budget movie)

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या रियाला चित्रपटांचे ऑफर्स मिळतील की नाही अशी शंका होती. मात्र आता तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जलेबी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र अभिनयापेक्षा रिया तिच्या अफेअरमुळेच जास्त चर्चेत आली. आता दिग्दर्शक रुमी जाफरी महाभारताशी संबंधित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असून त्यात रियाला संधी देण्याचं त्याने ठरवलं आहे.

या चित्रपटात पौराणिक कथेला नवं रुप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबद्दल रुमी जाफरी म्हणाला, "प्रत्येकालाच मागचं वर्ष वाईट गेलं. रियालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरुंगात काढावा लागला. रियाला अभिनय क्षेत्रात मी एक संधी देऊ इच्छितो."

काही दिवसांपूर्वी 'टाइम्स'ने 'सर्वांत आकर्षक महिला' ही यादी जाहीर केली होती. या यादीत रिया अग्रस्थानी दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रियाचा 'चेहरे' हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT