Rhea Chakraborty’s Inclusion In Manish Malhotra’s Diwali Party Netizens trolled her  sakal
मनोरंजन

Rhea Chakraborty: हिला कोणी बोलावलं? दिवाळी पार्टीत रियाला पाहून नेटकरी संतापले

अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवाळी पार्टीत सहभागी झाली म्हणून तिला ट्रोल केलं जात आहे.

नीलेश अडसूळ

Rhea Chakraborty: दिवाळी हा मोठा सण. बॉलिवूडमध्ये दिवाळी सेलिब्रेशनला दणक्यात सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आयुष्मान खुरानाने एक भव्य दिवाळी पार्टी आयोजित केली होती तर रमेश तौरानी आणि क्रिती सॅनन यांनी देखील एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी तारांकित दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीमध्ये सहभागी झाली म्हणून रिया चक्रवर्तीला चांगलेच ट्रोल केले गेले आहे.

या पार्टीमध्ये सिध्दार्थ मल्होत्रा, जानवी कपूर, ऐश्वर्या अभिषेक, माधुरी तिच्या पती बरोबर आली होती त्याशिवाय करणं जोहर, सिध्दार्थ कपूर अन्यथा पांडे सारखे बरेच फिल्मी कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील सहभागी झाली होती. पण तिचे पार्टीमध्ये येणे नेटकऱ्यांना चांगलेच खटकले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याबाबत नेगेटिव्ह कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Rhea Chakraborty’s Inclusion In Manish Malhotra’s Diwali Party Netizens trolled her )

रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) सुशांत सिंग राजपूत मडर प्रकरणात आणि ड्रग पॅडलिंग केस मध्ये अडकली आणि तिचे ग्रहच फिरले. या केस मध्ये तिचे नाव जोडले गेले तेव्हा पासून तिच्या विषयी चाहत्यांमध्ये प्रचंड द्वेष आहे. म्हणून आता दिवाळी पार्टीतही तिने येऊ नये असे अनेकांना वाटत होते.

रिया चक्रवर्तीने या पार्टीमध्ये सिल्व्हर रंगाची साडी नेसली होती एवढेच नाही तर अत्यंत खुश होऊन कॅमेरापुढे पोझ देत होती पण हा उत्साह तिला चांगलाच महागात पडला आहे. नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहे. तिला ट्रोल करत अत्यंत वाईट शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

एका युजरने लिहिले आहे की, 'OMG तिला कोणीही कुणी बोलावलं ???' तर दुसर्‍या युजर्सने लिहिले आहे की, “रिया ला पार्टीची भांडी घासायला बोलवले आहे" तर एकजण म्हणतो, "पार्टीमध्ये ड्रग्स विकायला आली की काय? चुडैल.'' तर अनेकांनी ही तर बॉलिवूडमध्यली घाण आहे, असेही म्हंटले आहे, त्यामुळे ही पार्टी तिला चांगलीच महागात पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT