Ricky Martin is accused of incest by his nephew who claimed they had a relationship for seven months  Instagram
मनोरंजन

पॉपस्टार रिकी मार्टिन अडचणीत,भाच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप

भाच्यानं रिकी मार्टिनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याप्रकरणात २१ जुलै रोजी कोर्टात सुनावणी आहे. मात्र याआधी गायकाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

प्रणाली मोरे

जगभरात प्रसिद्ध असलेला पॉपस्टार(Popstar) रिकी मार्टिनवर(Ricky Martin) काही दिवसांपूर्वी आरोप लागला होता की तो आपल्या भाच्यासोबतच सेक्शुअल(Sexual) आणि रोमॅंटिक रिलेशनशीपमध्ये(Relationship) आहे. आता या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया आली आहे. त्यानं या सगळ्या बातम्यांना खोटं ठरवलं आहे. इतकं गलिच्छ कोणी कसं बोलू शकतं असं देखील त्यानं म्हटलं आहे. त्यानं म्हटलं आहे की त्याच्या २१ वर्षीय भाच्यासोबत कधीही त्याचे शारिरीक संबंध नव्हते ना रोमॅंटिक रिलेशन.(Ricky Martin is accused of incest by his nephew who claimed they had a relationship for seven months)

यासंदर्भात केस दाखल करण्यात आली होती आणि त्याची सुनावणी २१ जुलै रोजी प्यूर्तो रिको येथील एका कोर्टात होणार आहे. रिकी मार्टिनवर लागलेल्या आरोपांवर त्याच्या वकीलानं म्हटलं आहे की,''रिकी मार्टिन कधीच त्याच्या भाच्यासोबत कुठल्याच सेक्शुअल किंवा रोमॅंटिक रिलेशनशीपमध्ये नव्हता. हे आरोप खूपच गलिच्छ आणि अर्थहीन आहेत. आम्हाला पूर्ण आशा आहे की,जेव्हा जज या केसविषयी पूर्ण माहिती करून घेतील,त्याचा योग्य तपास जाणून घेतील तेव्हा ही केसच रद्दबातल केली जाईल''.

शुक्रवारी १५ जुलै,२०२२ रोजी एका मनोरंजन वेब पोर्टलनं आपल्याला मिळालेल्या वृत्ताच्या माध्यमातून सांगितलं होतं की,रिकी मार्टिनवर हे गंभीर आरोप त्याच्या २१ वर्षीय भाच्याने लावले आहेत. या वेब पोर्टलच्या बातमीत असं देखील म्हटलं गेलंय की, रिकी मार्टिनचा भाचा यावेळी मानसिक तणावात असून डिप्रेशनचा देखील सामना करत आहे. भाच्यानं आरोपात म्हटलं आहे की,रिकी मार्टिनने त्याला ७ महिने डेट केलं आहे. रिकी सोबत त्याचा २ महिने आधीच ब्रेकअप झाला आहे. पण मार्टिन हे ब्रेकअप करण्याच्या विरोधात होता. माझ्या घराच्या आजुबाजूला तो कितीतरी वेळा मला दिसायचा असं देखील रिकी मार्टिनच्या भाच्यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT