rinku 
मनोरंजन

रिंकू राजगुरू आता करणार वेबविश्वाची सफर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटामुळे ती घराघरात पोहचली. तिला आणि अभिनेता आकाश ठोसरला एका रात्रीच स्टारडम प्राप्त झाले. अचानक दोघांच्याही नावाची चर्चा मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही होऊ लागली. सैराटला मिळालेल्या यशामुळे हिंदीतील अनेक निर्माते व दिग्दर्शकांना मराठी इंडस्ट्रीने भुरळ घातली. मराठी चित्रपटसृष्टी आणि सैराटचे कोडकौतुक होऊ लागले. मराठीतील अनेक निर्माते व दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट बनविण्याचे बेत आखू लागले. परंतु आकाशने एफयू (फ्रेण्डशीप अनलिमिटेड) चित्रपट केला तर रिंकूने 'कागर' आणि 'मेकअप' हे चित्रपट केले.  आता या चित्रपटांचे काय झाले हे सगळ्यांना ठाऊक आहे. आता रिंकूचा 'झुंड' चित्रपट येणार आहे.

अगदी कमी काळात चित्रपटात यश मिळाल्यानंतर आता रिंकू वेबविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती 'हंड्रेड' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही एक ऍक्शन- कॉमेडी वेबसीरिज आहे. विशेष म्हणजे रिंकूसोबत या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील या झळकणार आहे. लारा देखील या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहे. यामध्ये रिंकू नेत्रा पाटीलची भूमिका साकारत आहे. जी एक सामान्य मुलगी असून स्वित्झर्लंडला जाणाचे स्वप्न पाहत असते. लारा यामध्ये पोलिस अधिकारी बनली आहे

चित्रपट आणि आता वेबसीरीज असा रिंकूचा प्रवास सुरू झाला आहे. पहिल्यांदाच ती लारा दत्ताबरोबर स्क्रीन शेअर करीत आहे. ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. हाॅटस्टारवर ही वेबसीरीज येणार आहे. रिंकू म्हणते, की मी पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफाॅर्मवर पाऊल टाकत आहे याचा मला आनंद आहे. सध्या या प्लॅटफाॅर्मची चर्चा खूप होत आहे. मनोरंजनाचा हा नवीन प्लॅटफाॅर्म आहे आणि मी आनंदी आहे.  

rinku rajguru is now will be seen in webseries named hundred

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT