rishi 
मनोरंजन

लॉकडाऊनमध्ये दारुविक्री सुरु ठेवा अन्यथा आणखी नैराश्य येईल, ऋषी कपूर यांची सरकारकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..हा वाढता आकडा पाहून पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्चपासून २१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केलं होतं..या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं..किराणा मालाची दुकाने, मेडिकल या जीवनावश्यक गोष्टींव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने लॉकडाऊन दरम्यान सुरु राहणार नाहीत अशी सूचना दिली होती.दारु ही जीवनावश्यक गोष्टींमध्ये येत नसल्याने दारु विक्रिवरही बंदी घालण्यात आली आहे..मात्र लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने मद्यविक्री सुरु ठेवावी अशी मागणी थेट ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीच केली आहे..याबाबत त्यांनी थेट ट्वीटही केलं आहे..

ऋषी कपूर यांनी त्यांच्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, 'राज्य  सरकारला उत्पादन शुल्क  विभागाकडून पैशाची गरज आहे..संतापात आता नैराश्याची भर पडू नये..तसंही लोकांनी  पीणं थांबवलेलं नाही..फक्त ते आता कायदेशीर करा...उगाच ढोंगीपणा कशाला? असे माझे विचार आहेत..

'तर दुस-या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय, 'बघा विचार करा, सरकारने संध्याकाळी थोड्या वेळासाठी का होईना परवाना असलेली दारुची दुकानं सुरु ठेवावीत..मला चुकीचं समजू नका..सध्या माणसं घरात केवळ नैराश्य आणि अनिश्चितता सोबत घेऊन जगत आहेत..पोलिस, डॉक्टर, नागरिक इत्यादींना थोडं मोकळं होण्याची गरज आहे..तसंही दारुची बेकायदेशी विक्री सुरुच आहे ना..

'ऋषी कपूर यांच्या या ट्वीटला चांगलंच ट्रोल केलं गेलं आहे..लॉकडाऊनला कोणीच गांभीर्याने घेत नाही..सेलिब्रिटी देखील असं नेटक-यांनी सुनावलं आहे..खरं तर काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांना एका युजरने लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर, 'दारु का कोटा फुल है ना सर?' असं विचारलं होतं..त्यावेळी त्याला ऋषी यांनी मुर्खात काढलं होतं..त्या युजरला त्यांनी 'हा आणखी एक मुर्ख माणूस' म्हणत त्यांनी सुनावलं होतं..

ऋषी कपूर सध्या लॉकडाऊनमध्ये ट्वीटवर ट्वीट करत आहेत आणि ट्रोल देखील होत आहेत..काही वेळापूर्वीच ऋषी यांनी एक मुजरा व्हिडिओ ट्वीट केला होता..या व्हिडिओबाबत त्यांनी लिहिलं होतं की, '२०२० मधील हा टेक्नॉलॉजीकल मुजरा..घरातंच राहतात पैसै..इतर कंटाळवाण्यापेक्षा हा चांगलाच टाईमपास आहे'

ऋषी कपूर हे नेहमीच सोशल मिडीयावर त्यांचं मत परखडपणे मांडत असतात..यात त्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो..सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यालाच परवानगी आहे..त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून मद्यपान करणा-यांची चांगलीच अडचण झाली आहे..

rishi kapoor tweet on no liquor in lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT