riteish deshmukh play chhatrapati shivaji maharaj genelia deshmukh confirm the news at trial period movie event SAKAL
मनोरंजन

Genelia Deshmukh: रितेश देशमुख छत्रपती शिवराय साकारणारच! जिनीलिया देशमुखकडून दुजोरा

रितेश देशमुखने 2020 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रायोलॉजी बनवण्याची घोषणा केली होती

Devendra Jadhav

Genelia Deshmukh Trial Period News: काही वर्षांपुर्वी एक मोठी घोषणा झाली ज्यामुळे सर्वांना आनंद झाला. ही घोषणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमा.

अभिनेता रितेश देशमुख सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची साकारणार हे निश्चित झालं होतं. सिनेमाची घोषणा होऊन आता २ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय.

पण सिनेमा विषयी नंतर कुठे काहीच चर्चा नाही. पण आता रितेशची बायको जिनीलिया देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा तयार होणार आणि त्यात रितेश प्रमुख भुमिका साकारणार यावर मोहोर उमटवली आहे.

(riteish deshmukh play chhatrapati shivaji maharaj genelia deshmukh confirm)

रितेश शिवरायांवरील सिनेमांसाठी पुर्ण मेहनत घेईल

रितेश देशमुखने 2020 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रायोलॉजी बनवण्याची घोषणा केली होती. आता नुकतेच जिनीलिया डिसूझानेही या बातमीला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट तयार होत असल्याचं अभिनेत्रीचं म्हणणं आहे, पण त्यासाठी घाई नाही.

जेनेलिया म्हणाली, 'हा चित्रपट रितेश देशमुखच्या मनाच्या खूप जवळ आहे. या प्रकल्पासाठी तो आपले जीवन समर्पित करेल. हा प्रकल्प घाईगडबडीत मार्गी लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." असं जिनीलिया म्हणाली

नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन

2020 मध्ये रितेश देशमुख आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ट्रायोलॉजी चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

हा चित्रपट अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊस 'मुंबई फिल्म कंपनी'च्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. 19 फेब्रुवारी 2020 रोजी रितेशने ट्विट करून ही माहिती दिली. इतकंच नव्हे रितेशने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

आता जिनीलियाने केलेला खुलासा पाहून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल ही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान जिनीलिया देशमुखचा ट्रायल पिरीयड हा नवीन सिनेमा २१ जुलैला रिलीज झालाय.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील आगामी सिनेमे

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

तर दुसरीकडे अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमात अक्षय झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT