riteish 
मनोरंजन

मन हेलावणारी 'ही' परिस्थिती पाहून रितेशने केली मजुरांना मोफत रेल्वेसेवा देण्याची मागणी..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यामुळे सद्य परिस्थिती पाहता देशातील लॉकडाऊन देखील १७ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. लॉकडाऊन आज उद्या संपेल या आशेवर असलेल्या असंघटित कामगारांची अस्वस्थता आता कमालीची वाढली असून अनेकांनी तर आपापल्या गावी परतण्यासाठी कोसो मैल प्रवास पायीच सुरु केला आहे. अशा कामगारांना तरी गावी जाण्यासाठी मोफत रेल्वेसेवा देण्यात यावी अशी मागणी अभिनेता रितेश देशमुख याने केली आहे. याविषयी ट्वीट करत त्याने मन हेलावणा-या परिस्थितीचा फोटो देखील शेअर केला आहे. 

रितेशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक मजूर आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून पायी प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. रितेशने हा फोटो ट्वीट करत लिहिलंय, 'एक देश म्हणून परप्रांतीयांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठीचा खर्च आपण उचलला पाहिजे, रेल्वेसेवा मोफत दिली पाहिजे, त्यांच्यावर (मजूर) आधीच पगाराशिवाय जगण्याची परिस्थिती ओढावली आहे त्यातंच राहण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर देखील नसल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोकासुद्धा जास्त आहे.' रितेशने यासोबत शेअर केलेला फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी अडकलेल्या या मजुरांचं जगणं दिवसाच्या कमाईवर अवलंबुन आहे. सध्या सगळेट उद्योगधंदे बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांना सतावत आहे. जवळ असलेली आत्तापर्यंतची जमापुंजीही या लॉकडाऊनमुळे संपत चालली आहे त्यामुळे त्यांच्याकडे सध्या दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही आहे. म्हणूनंच जीवावर उदार होऊन या मजुरांनी आता गावी परतण्यासाठी परतीचा प्रवास सुरु केला आहे तो ही असा पायी....  

riteish deshmukh tweets train services should be free for migrants  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

Narayangaon News : वारूळवाडी वनक्षेत्राला आग; वेळीच नियंत्रणामुळे मोठी दुर्घटना टळली!

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

SCROLL FOR NEXT