Riverdale Actor Ryan Grantham To Serve Life Sentence For Murdering Mother Esakal
मनोरंजन

हॉलीवूड अभिनेत्याचा आईच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याचा होता प्लॅन...

'रिवरडेल' आणि 'डायरी ऑफ ए विम्पी किड' सिनेमांचा अभिनेता रायन ग्रांथमला आईच्या हत्ये प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

प्रणाली मोरे

Hollywood Actor Ryan Grantham:आजच्या काळात काय घडेल आणि काय नाही हे सांगता यायचं नाही. घरातही आपल्यांच्या जीवावर उठणारे आज कमी नाहीत. जन्मदात्या आईला जिथं मारलं जातं तिथं आणखी काय अपेक्षा करायची. हॉलीवूड अभिनेत्यानं असंच एक भयानक कृत्य केलं आहे. रिवरडेल आणि डायरी ऑफ ए विम्पी किड सिनेमांचा अभिनेता रायन ग्रांथम,ज्याचं वय अवघं २४ वर्षांचे आहे. अभिनेत्यानं मार्च,२०२० मध्ये आपल्याच आईची हत्या केली आणि आता त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, कोर्टाने २० सप्टेंबर रोजी ग्रांथमला आईच्या हत्ये प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.(Riverdale Actor Ryan Grantham To Serve Life Sentence For Murdering Mother)

सीबीएस न्यूजच्या माहितीनुसार कळत आहे की, रायन ने पियानो वाजवताना आपली आई बार्बरा वाइच्या डोक्यावर बंदूकीतनं गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली. या प्रकरणात त्याला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटीश कोलंबियाच्या सुप्रिम कोर्टानं व्हॅंकूव्हर मध्ये यावर निर्णय दिला. ग्रांथमला रिवरडेल मधील त्याच्या भूमिकेमुळे ओळखले जाते. त्यानं सुपर नॅचरल आणि iZombie,फॉलिंग स्काईज सिनेमातून देखील काम केले आहे.

जेव्हा ग्रांथमला आईच्या हत्येप्रकरणात शिक्षा झाली तेव्हा असं देखील समोर आलं होतं की ग्रांथमचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांची हत्या करण्याचा देखील प्लॅन होता. असं त्यावेळी कॉम्प्लेक्स कॅनडानं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. ग्रांथमचा कॅनडाचे पंतप्रधान टूडो यांना मारण्याचा प्लॅन होता,जे पोलिसांना दिलेल्या साक्षीमधून समोर आलं होतं.

सुरुवातीला फर्स्ट डिग्री मर्डरचा आरोप त्याच्यावर लागल्यानंतर,ग्रांथमने या वर्षाच्या सुरुवातीला सेकन्ड डिग्री मर्डरची देखील कबूली दिली. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये काही व्हिडीओज देखील होते. ज्यांना ग्रांथमच्या पूर्ण चौकशी दरम्यान शूट करण्यात आलं होतं. यामधील एका व्हिडीओत त्यानं आपल्या आईच्या हत्येची कबूली दिली आहे. हे देखील त्यानं सांगितलं की एक सामूहिक हत्या करण्याचा देखील विचार होता,ज्यात साइमन फ्रेजर युनिव्हर्सिटीमधील त्याचा एक मित्र देखील सामिल होता. ग्रांथमची बहिण लिसा ग्रांथमने देखील कोर्टात साक्ष दिली की तिचा भाऊ खूप खतरनाक माणूस आहे. तो काहीही करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT