Neetu Kapoor Review of Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Review Esakal
मनोरंजन

Neetu Kapoor Review: माझी गुणी सून! आलियाचा सिनेमा पाहून सासूबाई खुश...

Vaishali Patil

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Review: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या बहूप्रतिक्षित चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 28 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणि रिलिज करण्यात आली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. आई झाल्यानंतर आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहते तिच्या चित्रपटासाठी उत्सूक आहेत.

मंगळवारी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाची बॉलिवूडमधल्या काही खास कलाकारांसाठी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी रणबीर आणि आलियाच्या जोडीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. रणबीरशिवाय करिश्मा कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, शबाना आझमी, जया बच्चन, नेहा धुपिया, अंगद बेदी, सारा अली खान, मलायका अरोरा अनेक कलकार दिसले.

सर्व कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि दोघांचे कौतुक केले. पण चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू रणबीर कपूरने देखील बायकोचं तोंड भरुन कौतुक केलं.

आलिया भट्टची सासू नीतू कपूरने देखील 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. नीतू कपूरला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट खुप आवडला

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Review by Neetu Kapoor

ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत त्या लिहितात की, 'सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय... सर्वांचे मनोरंजन करणारा चित्रपट. आलिया भट्ट खूपच सुंदर दिसतेय.

सासूबाई कौतुक केल्यामुळे आलियालाही खुप आनंद झाला तिनेही स्टोरीला शेयर करत लव्ह यू असं म्हटलं आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंगशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. बऱ्याच वर्षानंतर करण जोहर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. आता येत्या शुक्रवारी रिलिज होणाऱ्या चित्रपटाबद्दल चाहते खुप उत्सूक दिसत आहे. मात्र चित्रपटला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तर बॉक्स ऑफिसच्या कलेक्शन वरुनच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT