rohit shetty, indian police force SAKAL
मनोरंजन

Rohit Shetty: भरधाव वेगात धावणारी गाडी रोहित शेट्टी अशी उडवतो.. समोर आला थरारक व्हिडिओ

रोहित शेट्टीने गोलमाल पासून बॉलिवूड मध्ये एक प्रथा सुरु केलीय ती म्हणजे गाड्या उडवण्याची

Devendra Jadhav

Rohit Shetty: रोहित शेट्टी बॉलिवूड मधला आघाडीचा दिग्दर्शक. रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे ऍक्शन आणि कॉमेडीचा तडका. रोहित शेट्टीच्या सिनेमातली अजून एक खास गोष्ट म्हणजे भव्यदिव्य सेट्स आणि गाड्या. रोहित शेट्टीने गोलमाल पासून बॉलिवूड मध्ये एक प्रथा सुरु केलीय ती म्हणजे गाड्या उडवण्याची. गोलमाल मध्ये जो कार रेसिंगचा सिक्वेन्स आहे त्यात अनेक गाड्या हवेत उडताना दाखवल्यात. रोहितच्या या खास शैलीची सगळीकडे चर्चा आहे.

भरधाव चालणाऱ्या गाड्या रोहित शेट्टी नेमका उडवतो कसा.. असं कुतूहल अनेकांच्या मनात आहे. स्वतः रोहित शेट्टीने त्याच्या आगामी इंडियन पोलीस फोर्स मधला या सिरीज मधला एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत रोहित भरधाव धावणारी एका क्षणात कसा उडवतो हे पाहायला मिळतंय. या थरारक व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

या व्हिडिओत रस्त्यावर धावणारी एक पिवळी गाडी समोरच्या गाडीला ठोकते. आणि ती गाडी हवेत उडून खाली उलटी पडते. या सिनचा मास्टरमाईंड रोहित एका ओपन जीप मध्ये मागे असून हा सगळा सिन त्याच्या कॅमेरात शूट करतो. शूट चांगलं झाल्याने रोहित आनंदी असतो. तो हात उंचावून शॉट ओके झालाय असं सर्वाना सांगतो.

काही दिवसांपूर्वी रोहितचा अपघात झाल्याची घटना घडली होती. खतरो के खिलाडी म्हणुन ओळख असलेला चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. रोहित शेट्टी त्याचा ड्रीम प्रोजेक्ट इंडियन पोलिस फोर्स या वेब सिरीजसाठी शूटिंग करत होता. त्याचवेळी हा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

कार चेस सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली आहे. . त्यानंतर प्रॉडक्शन टीमने त्याला कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने किरकोळ शस्त्रक्रिया केली असली आणि रोहित शेट्टीला त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT