Rohit Shetty to produce biopic on Mumbai top cop Rakesh Maria. Read details Google
मनोरंजन

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांवर बायोपिक,रोहित शेट्टीची घोषणा

सिनेमातून मुंबईतले ९३ चे बॉम्बस्फोट,९० सालातलं अंडरवर्ल्डचं जग आणि दहशतवादी कसाब संदर्भातील अनेक अंतर्गत गोष्टींचा खुलासा होणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक रोहित शेट्टीनं(Rohit Shetty) आता मुंबईचे माजी पोलिस कमिश्नर राकेश मारिया(Rakesh Maria) यांच्या जीवनावर आधारित बायोपीक काढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. रोहित शेट्टीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची घोषणा केली आहे आणि राकेश मारियांसोबतचा एक फोटो देखील त्यानं शेअर केला आहे. फोटोत रोहित शेट्टीच्या हातात राकेश मारिया यांनी लिहिलेलं पुस्तक आहे,ज्याच्या मुखपृष्ठावर राकेश मारिया यांचा फोटो दिसत आहे,तर राकेश मारिया यांनी रोहितच्या खांद्यावर हात ठेवत निखळ स्माइलही कॅमेऱ्याला पोझ देताना दिलं आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटसोबत मिळून रोहित शेट्टी या बायोपीकची निर्मिती करणार असल्याचं बोललं जात आहे. बायोपीकच्या माध्यमातून राकेश मारिया यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे क्राइम जगतातले अनेक अंतर्गत खुलासे केले जातील असंही म्हटलं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः राहित शेट्टी करणार आहे.

रोहित शेट्टीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,''मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणापासून, ते ९० च्या दशकात डोकं वर काढलेल्या अंडरवर्ल्डचा सामना करेपर्यंत ते अगदी दहशतवादी कसाबकडून माहिती काढून घेईपर्यंत,२६/११ ला आपल्या शहराच्या रक्षणासाठी भक्कमपणे उभे राहणारे... राकेश मारिया यांचं धाडस आणि पराक्रम पडद्यावर आणताना मला खूप अभिमान वाटत आहे''

रोहित शेट्टी राकेश मारिया यांच्यावर सिनेमा काढत आहे हे कळल्यानंतर आता त्यांची भूमिका सिनेमात कोणता हिरो साकारणार ते कसाबविषयी आणखी कोणते खुलासे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आणि सोशल मीडियावर त्यामुळेच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT