rohit shinde birthday wishes to ruchira jadhav patchup after bigg boss marathi 4  SAKAL
मनोरंजन

Ruchira Jadhav - Rohit Shinde: बिग बॉसनं वाजवलं पण बर्थडेनं जमवलं! रोहीतचं रुचिरासाठी खास सरप्राईज

बिग बॉस मराठी 4 मध्ये रोहीत शिंदे - रुचिरा जाधव हे कपल सहभागी झालं.

Devendra Jadhav

Ruchira Jadhav - Rohit Shinde News: बिग बॉस मराठी 4 शो चांगलाच गाजला. बिग बॉस मराठी 4 च्या निमित्ताने एक गोष्ट घडली जिची बरीच चर्चा झाली. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा बिग बॉस मराठी 4 मध्ये रोहीत शिंदे - रुचिरा जाधव हे कपल सहभागी झालं.

पण बिग बॉसच्या घरात असताना रोहीत - रुचिरामध्ये वाजलं. दोघांमध्ये टोकाचे वाद आणि मतभेद झाले. आणि दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगु लागल्या. काल म्हणजेच १३ जुलैला रुचिराचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने रोहीत - रुचिरा पुन्हा एकत्र आलेले दिसले.

(rohit shinde birthday wishes to ruchira jadhav patchup after bigg boss marathi 4)

रुचिराचा वाढदिवसाला रोहीतची डेट - भेट

रुचिराचा वाढदिवस काल झाला. १३ जुलैला रुचिराने वाढदिवसानिमित्त सुंदर फोटो पोस्ट केले होते. रुचिरा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत होती. रुचिराच्या फॅन्सनी तिला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या.

पण या सगळ्यात रुचिराचा बॉयफ्रेंड रोहीत तिला शुभेच्छा देतो का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण वाढदिवस उलटून गेल्यावर रोहीतने रुचिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. इतकंच नव्हे तर, रोहीत - रुचिराने खास डेट - भेट घेतलीय.

रुचिराच्या वाढदिवसाला रोहीत म्हणतो...

रोहीत आणि रुचिरा रोमॅंटीक डेटवर गेले आहेत. या डेटमध्ये त्यांनी एक विला बुक केलेला दिसतोय. Its Your Special Day, Happy Birthday To You अशा शब्दात रुचिराने रोहीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभेच्छा देताना रोहीतने रुचिरासोबतचा रोमॅंटीक फोटो पोस्ट केलाय. याशिवाय खाली एका छोट्या बॉक्समध्ये रोहीत लिहीतो.. Last but Special Entry (शेवटी आलोय पण स्पेशल आलोय)

बिग बॉस मराठी ४ मध्ये रुचिरा जाधव सहभागी होती. रुचीरा जाधव तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदे सोबत सहभागी होती. रुचिरा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

बिग बॉसमध्ये असताना रोहीत - रुचिराचं बिनसलं होतं. पण आता रुचिराच्या बर्थडे निमित्ताने दोघे एकत्र आलेत असं दिसतंय.

रुचिराचा बिग बॉस मध्ये प्रवास काहीसा लवकर संपला तरीही तिच्या फॅन फॉलोईंग मध्ये अजिबात कमी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT