Ronit Roy
Ronit Roy Instagram
मनोरंजन

Ronit Roy Son Video: 'हा तर दुसरा अमिताभ..', 6 फूट 6 इंच उंचीच्या रोनित रॉयच्या मुलाची सोशल मीडियावर हवा..

प्रणाली मोरे

Ronit Roy Son Video: आपल्या दमदार अभिनयासाठी बॉलीवूडमध्ये ओळखला जाणारा अभिनेता रोनित रॉय सध्या त्याच्या 'गुमराह' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला तो आपल्या कुटुंबासोबत उपस्थित राहिला होता तेव्हा सगळी लॅमलाइट खेचून घेऊन गेला तो त्याचा मुलगा अगस्त्य.

या खास क्षणी रोनितची बायको निलम देखील त्यांच्यासोबत उपस्थित होती. यादरम्यान रोनितचा मुलगा अगस्त्यनं आपल्या साधेपणानं सगळ्यांचे मन जिंकले असल्याचं बोललं जात आहे. मीडियाला तरी अगसत्य भलताच आवडला आहे. (Ronit Roy Son Agasthya is tall, dark, handsome photo viral fans shocked and said he is second amitabh)

Ronit Roy and his Son

अगस्त्यची उंची खूपच छान आहे आणि या स्क्रीनिंगला तो ज्या पेहरावात आलाय त्यात खूपच स्मार्ट दिसत आहे. रोनितच्या मुलाला सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी विचित्र कमेंट्सही दिल्या आहेत.ज्यावर रोनित रॉयनं स्पष्टिकरणही दिलं होतं.

काही नेटकऱ्यांना उत्तर देत रोनितनं लिहिलं की,'त्याचा मुलगा अॅबनॉर्मल किंवा स्पेशल नाहीय..पण उंचीला थोडा जास्त आणि लाजाळू आहे. काही कमेंट्स आपण वाचल्या ज्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटलं', असं देखील रोनित रॉय म्हणाला.

'अगस्त्यची उंची १५ व्या वर्षी ६ फूट,६ इंच झाली होती त्यामुळे आपल्या या उंचीसोबत नेहमी तो अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो'.

रोनित रॉय पुढे म्हणाला की,'मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी माझ्या मुलाला समजुन घेतलं आणि त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी बोलले'.

'गुमराह'मध्ये मुख्य भूमिकेत आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर आहेत. तर सिनेमात रोनित रॉयची देखील महत्त्वाची भूमिका आहे. रोनित रॉय या सिनेमात पोलिस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन वर्धन केतकरनं केलं आहे,तर भूषण कुमारनं सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाची कहाणी एका युवकाच्या हत्येभोवती फिरताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT