rrr fame actor ram charan meet cm eknath shinde and family in mumbai SAKAL
मनोरंजन

Ram Charan - CM Shinde: सुपरस्टार राम चरणने घेतली एकनाथ शिंदेंची भेट, मुख्यमंत्र्यांनी असं केलं स्वागत

राम चरणने मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे

Devendra Jadhav

Ram Charan - CM Shinde News: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सोशल मीडियावर सक्रीय असतो. राम चरण सध्या मुंबईला आलाय. रामची पत्नी सुद्धा यावेळी त्याच्यासोबत आहे.

राम मुंबईत आल्यावर महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनाला गेला होता. आता रामने सपत्नीक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतलीय. मुख्यमंत्री शिंदेंच्या सोशल मीडिया अकाऊंटने हे फोटो शेअर केले.

मुख्यमंत्र्यांच्या घरी राम चरणची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सोशल मीडिया अकाऊंटने सांगितलं की, "दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेता राम चरण तेजा आणि त्यांची पत्नी उपासना यांनी आज सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. तसेच यावेळी या दोघांसमवेत चित्रपट क्षेत्रासह विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधला.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि स्नुषा सौ.वृषाली श्रीकांत शिंदे याही उपस्थित होत्या."

रामचरण मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला

एका चाहत्याने काही दिवसांपुर्वी X वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राम मुंबईत स्पॉट झालेला दिसला. पांढरा शर्ट परिधान करुन राम अनवाणी पायाने मंदिरातून बाहेर पडताना दिसला. त्याच्यासोबत उपासना आणि त्यांचे बाळ सुद्धा होती.

राम प्रचंड धार्मिक असून तो कुटुंबाला घेऊन देवदर्शनाला आलाय, असं समजतंय.

राम चरण मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला

ऑक्टोबर महिन्यात राम चरण मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसला. त्याला पाहण्यासाठी मंदिराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. राम चरणने त्यावेळी 41 दिवसांची अयप्पा दीक्षा घेतली होती. राम चरण मुंबईत आला तेव्हा त्या दीक्षेची सांगता झाली. सोशल मीडियावर राम चरणचे बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT