RRR' Fans Damage Theatre Property
RRR' Fans Damage Theatre Property Google
मनोरंजन

RRR सिनेमा पाहताना अचानक प्रेक्षक भडकले,थिएटरची केली तोडफोड

प्रणाली मोरे

एस.एस.राजामौली(SS Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' सिनेमानं खरंतर प्रदर्शनाआधीच चाहत्यांमध्ये आपली क्रेझ निर्माण केली होती. दाक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे दोन मोठे स्टार अन् सोबत बॉलीवूडची सध्याची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) ही सिनेमात असल्याचं आकर्षण,त्यात अजय देवगणची स्पेशल एन्ट्री यामुळे दक्षिणेकडचे चाहतेच नाही तर बॉलीवूडप्रेमीही सिनेमाच्या प्रदर्शनाकडे डोळे लावू बसले होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यावरही प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण मग असं काय घडलं की अचानक थिएटरमध्ये सिनेमा पहायला आलेल्या प्रेक्षकांनी खुरर्च्यांची तोडफोड सुरू केली. जाणून घ्या काय घडलं नेमकं?

'RRR' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत आपल्याला एका थिएटरच्या आत तोडफोड होताना दिसत आहे. हे थिएटर आहे,आंध्रप्रदेशातील विजयवाडा इथलं. त्याचं झालं असं की,अचानक 'RRR' सिनेमा सुरू असताना तांत्रिक अडचण आली आणि सिनेमा बंद पडला. आता दाक्षिणात्य सिनेमांचे चाहते सिनेमासाठी,त्यातील कलाकारांसाठी किती वेडे असतात हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे सिनेमा पाहण्यात रंगून गेलेल्या प्रेक्षकांना स्क्रीन बंद पडून व्यत्यय आल्यानं राग अनावर झाल्याचं चित्र या व्हिडीओतून दिसत आहे.

आता एकीकडे 'RRR' सिनेमाला पसंती मिळतानाचं चित्र दिसत आहे,सोशल मीडियावर चाहते थेट ,सिनेमाचा रिव्ह्यू देताना दिसत आहेत. सिनेमात काय आवडलं याविषयी जो-तो आवर्जुन बोलताना दिसतोय. सिनेमातील कलाकार हॅशटॅगसोबत ट्रेंड करीत आहेत. काही थिएटरमध्ये तर चक्क सिनेमातील गाण्यावर,संवादांवार चाहत्यांनी ठेका धरलेलाही पाहिला. त्यात आता 'RRR' च्या प्रेमाखातर थिएटरात तोडफोड झाल्यानं सिनेमासोबत त्या व्हिडीओचीही जोरदार चर्चा रंगली आहे. एस.एस.राजामौली सिनेमा आता बॉक्सऑफिसवर काय कमाल करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. बातमी आहे की हा सिनेमा HD लीक झालाय त्यामुळे याचा बॉक्सऑफिसवर काय परिणाम होईल हे पुढील एक-दोन दिवसांत स्पष्ट होईलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT