RRR Boxoffice Collection dropped? Google
मनोरंजन

जगभरात 9०० करोड कमावलेल्या 'RRR' ला पहिला मोठा झटका; काय घडलं नेमकं?

२५ मार्च २०२२ ला RRR सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून जगभरात ब़ॉक्सऑफिस कलेक्शनवर त्यानं वेगानं कमाई केली होती.

प्रणाली मोरे

एस.एस.राजमौली(s.s.Rajamouli) दिग्दर्शित RRR सिनेमाला जगभरात ९०० करोड कमावल्यानंतर पहिल्यांदाच मोठा झटका बसला आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये लक्षात येईल इतका कमी प्रतिसाद मिळताना दिसला आहे. दर दिवसाला डबल डिजिटमध्ये कमाई करणाऱ्या या सिनेमाची कमाई आता सिंगल डिजिटवर पोहोचली आहे. ट्रेड रिपोर्ट्स च्या म्हणण्यानुसार,आधीच्या तुलनेत आता RRR च्या हिंदी व्हर्जनच्या कलेक्शनमध्ये जवळ जवळ ४५ टक्के घसरण झालेली दिसून आली आहे. पण दुसरीकडे जागतिक पातळीवर RRR ने नवा इतिहास रचत ९०० करोडची कमाई केली आहे.

RRR च्या हिंदी व्हर्जनने ४ एप्रिल २०२२ रोजी एका दिवसात ७ करोड कमावले,ज्यामुळे आता सिनेमाचं नेट कलेक्शन १९१.५९ करोड झालं आहे, म्हणजे २०० करोडपर्यंत पोहोचायला जवळ-जवळ ८.४१ करोड आणखी कमाई करणं आवश्यक आहे. ट्रेड अॅनलिस्टना आशा होती की मंगळवारी ५ एप्रिलला सिनेमा २०० करोडचा टप्पा पार करेल. पण आता ज्या पद्धतीनं सिनेमाच्या हिंदी व्हर्जनच्या बॉक्सऑफिस कलेक्शनमध्ये घसरण पहायला मिळत आहे त्यावरनं आणखी काही दिवस २०० करोडपर्यंत मजल मारायला लागतील असं बोललं जात आहे.

जर राजामौलींचा RRR सिनेमा २०० करोड पार करु शकला तर तो 'द काश्मिर फाईल्स'ची बरोबरी करु शकेल. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमानं ओपनिंगला ३.५५ करोड कमावले होते आणि १३ व्या दिवशी 'द काश्मिर फाईल्स'नं २०० करोडची कमाई करीत एक नवा इतिहास रचला होता. २५ मार्चला सिनेमागृहात मोठ्या रुबाबात दाखल झालेल्या RRR सिनेमानं २०.०७ ची ओपनिंग केली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत डबल डिजिटमध्येच हा सिनेमा कमाई करीत होता. सिनेमानं पहिल्या आठवड्यात १३२.५९ करोडचं कलेक्शन केलं होतं. सिनेमानं केवळ पाच दिवसात १०० करोड कमावले होते.

ट्रेड अॅनलिस्टच्या अभ्यासानुसार,RRR ने जगभरात ९०० करोडचा टप्पा पार केला आहे,ज्यामध्ये सिनेमाच्या तेलगु आणि हिंदी सहित सगळ्याच भाषांच्या कलेक्शनचा समावेश आहे. आता हा सिनेमा जगभरात १००० करोड कमावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरंतर आतापर्यंत जागतिक पातळीवर बॉक्सऑफिसवर जास्त कलेक्शन करणाऱ्या सिनेमामंध्ये टॉपवर आहे आमिर खानचा 'दंगल', ज्यानं तब्बल २००० करोड कमावले होते. चीनी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त 'दंगल' सिनेमानं कमाई केली होती. दुसऱ्या क्रमांकावर 'बाहुबली २- द कन्क्लूजन आहे',ज्यानं जवळ-जवळ १८०० करोड कमावले होते. पण चीनच्या बॉक्सऑफिसवर बाहुबलीला जास्त यश मिळालं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT