Rubina Dilaik Instagram
मनोरंजन

Rubina Dilaik: 'तू तर राखी सावंत दिसतेयस..', सुजलेल्या चेहऱ्याच्या रुबिनाला पाहून यूजर्सच्या भन्नाट कमेंट्स

रुबिना दिलैकनं सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर करत चेहरा सूजण्याचं कारणही सांगितलं आहे.

प्रणाली मोरे

Rubina Dilaik: टी.व्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैकनं नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे..जो पाहिल्यावर सगळ्यांनाच थोडा धक्का बसला आहे. या फोटोत रुबिनाच्या चेहऱ्याचा पूर्ण नक्षाच बदलल्याचं दिसत आहे.

तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. काहींनी म्हटलंय की,'तू एक्स्पायर मेकअप चेहऱ्याला लावला होतास का?',तर काहींनी रुबिना दिलैकला 'लवकर बरी हो' म्हणत काळजी व्यक्त केली आहे.

खरंतर रुबिना दिलैकची तब्येत सध्या बिघडली आहे ती आजारी आहे आणि म्हणून त्यामुळे तिच्या चेहऱ्याला सूज आली आहे. हेच कारण आहे की रुबीना दिलैकचे चाहते तिची चिंता करु लागलेयत. (Rubina Dilaik face is in bad condition swelling on lips fan says she look like a rakhi sawant)

रुबिना दिलैकनं इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की,तिला ताप आलाय, घसाही दुखतोय म्हणजे इन्फेक्शनमुळे. असं तिनं म्हटलंय.

आणि सोबत ओठांना चांगलीच सूज आलीय त्यामुळे आपलं तोंड एखाद्या बदकासारखं दिसत आहे असं तिनं लिहिलं आहे. या आजारपणामुळे आपण खूप कंटाळलोय,त्रस्त आहोत आणि सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याला सूज आल्यानं इरिटेट देखील झालो आहोत.

स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहून मलाच हसू येतंय हे सांगायाला देखील रुबिना विसरली नाही बरं का.

फोटोमध्ये रुबिना दिलैकचे ओठ सुजलेले दिसत आहेत. तिनं म्हटलंय, ''कोणत्याही फिलर किंवा सर्जरी शिवाय माझे ओठ बदकासारखे झालेयत''. रुबीनाचे डोळे देखील फोटोत सुजलेले दिसत आहेत आणि ती खूप कमकुवत दिसत आहे.

रुबिना दिलैकचे फोटो पाहून आता तिचे चाहते मात्र चिंतेत सापडलेयत. काहीजण तर तिची मस्करी करताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'वाटतं मॅडमनी एक्स्पायर मेकअप चेहऱ्याला लावला म्हणून हे असं झालं'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'असं काय खाल्लंस म्हणून चेहऱ्याचं हे असं झालं?', एकानं तर चक्क लिहिलं आहे की,' तू तर राखी सावंतसारखी दिसतेस'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT