ruchira jadhav and dr rohit shinde patch up meet together in bigg boss marathi 4  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: ज्या घराने वेगळं केलं त्याच घराने.. असं झालं रोहित-रुचिराचं मनोमिलन..

बिग बॉस मराठीच्या घरात मोठा ट्विस्ट..

नीलेश अडसूळ

Rohit Shinde And Ruchira jadhav patch up : 'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं. पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहितवर रागावल्याचं चित्र समोर आलं होतं. दोघांमध्ये गैरसमज झाले, प्रचंड दुरावा आला.. पण ज्या घराने त्यांना वेगळं केलं त्याच घरात त्यांच्यात समेट घडतानाही आजच्या भागात दिसणार आहे.

(ruchira jadhav and dr rohit shinde patch up meet together in bigg boss marathi 4 )

बिग बॉस मध्ये आलेल्या या जोडीत चांगलीच फुट पडली. घरात झालेले वाद घराबाहेरही सुरूच राहिले. सोशल मीडियावरही रुचिरानं रोहितला अनफॉलो केलं अन् त्यांच्यात ब्रेकअप होणार अशा चर्चा होऊ आला. रुचिराने वेळ मागितला आहे, असं रोहितने जाहीर केलं. पण त्यांच्यातलं नातं पूर्ववत होईल का नाही ही कुणालाच माहीत नव्हतं. अखेर तो क्षण आलाच.

बिग बॉसने फिनाले च्या आधी सर्व 16 स्पर्धकांचे रीयुनियन केले. म्हणजे सर्व सोळा स्पर्धकांना एकत्र घरात जाण्याची संधी दिली. त्यांच्यासाठी एक छोटी पार्टी देखील अरेंज करण्यात आली होती. यावेळी 16 स्पर्धकांमध्ये रोहित आणि रुचिराही होते. पण ते दोघेही एकमेकांशी बोलले आहे. जवळपास घरात येऊन सर्वजण एकमेकांमध्ये मिसळले, धमाल केली पण त्या दोघांमध्ये अबोला दिसला.

शेवटी त्यांच्यातील नाते पुन्हा सांधण्यासाठी प्रसाद जवादेने पुढाकार घेतला. सर्वजण खीर खात असताना तुम्ही दोघांनी आता झालेले सर्व गैरसमज इथेच सोडा, आणि एक व्हा असं ती म्हणाला. दोघांनाही एकमेकांना खीर भरवण्याचा आग्रह केला. ज्यावेळी दोघेही थोडे अवघडले पण त्यांनी पुढाकार घेत नात्यातील दुरावा मिटवला. आणि जय घरात ते वेगळे झाले तिथेच त्यांची मनं जुळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT