Ruslaan Mumtaz gets stuck in Manali floods: There’s no network, no way to reach home SAKAL
मनोरंजन

Manali Floods Ruslan Mumtaz: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला, डोळ्यासमोर रस्ता वाहून गेला, व्हिडीओ व्हायरल

मनालीच्या डोंगरावरही परिस्थिती वाईट आहे. अशातच टीव्ही अभिनेता रुसलान मुमताजही तिथे अडकला आहे.

Devendra Jadhav

Ruslan Mumtaz Stuck in Manali Floods News: मनाली पुराने हाहाकार माजवलाय. सध्या हिमाचलमध्ये अशीच स्थिती आहे, जिथे डोंगरावर अनेक भूस्खलन होत आहेत आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सर्वत्र ढिगारा दिसत आहे.

मनालीच्या डोंगरावरही परिस्थिती वाईट आहे. अशातच टीव्ही अभिनेता रुसलान मुमताजही तिथे अडकला आहे. रुसलानने व्हिडीओ शेअर करत धक्कादायक माहीती सांगीतली.

(Ruslaan Mumtaz gets stuck in Manali floods: There’s no network, no way to reach home)

पुरामुळे मनाली ते चंदीगडला जोडणारा रस्ताही पूर्णपणे तुटला आहे. रुस्लान मुमताजने मनालीहून त्याचा व्हिडिओ शेअर केला असून तो तिथे कोणत्या अवस्थेत अडकला आहे, हे दाखवले आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेता जिथे उभा आहे, तिथे समोर नदीचे पाणी तुंबलेले दिसत आहे, रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.

रुस्लान व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'मी सध्या मनालीमध्ये अडकलो आहे, जिथे नेटवर्क नाही. घरी परतण्याचा मार्गही नव्हता. या सुंदर ठिकाणी सध्या कठीण काळ सुरु आहे. मला समजत नाही की मी आनंदी व्हावे की दुःखी किंवा आभारी व्हावे की कृतज्ञ व्हावे."

आता रुसलान मुमताजचा हा व्हिडिओ पाहून लोकांना त्याची काळजी लागुन राहीली आहे. "तेथून बचावासाठी तुम्हाला हेलिकॉप्टर लागेल." अशा कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.

रुसलानने याआधी मनालीला पोहोचलेल्या सुंदर ठिकाणांची काही झलक शेअर केली होती. ईतक्या निसर्गरम्य परिसरात पुढच्या काही दिवसात इथे काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

सध्या मनालीमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक हॉटेल, रस्ते, घरे, पर्वत आणि झाडे पाण्यात वाहून गेली आहेत. या ठिकाणी रेड अलर्ट कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT