sai lokur pregnancy marathi actress on social media shared cute video  SAKAL
मनोरंजन

Sai Lokur Pregnant: नवखी चाहूल, इवलं पाऊल.. बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरने दिली गुड न्युज

सई लोकूरने चाहत्यांना गुड न्युज दिलीय

Devendra Jadhav

Sai Lokur Pregnancy News: सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई लोकूरने चाहत्यांना गुड न्युज दिलीय. सई आणि तिचा नवरा तिर्थदीप रॉय या दोघांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.

सईने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करुन तिच्या सर्व फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केलीय. सई आपल्याला बिग बॉस मराठी 2 मध्ये दिसली होती.

सई आणि तिर्थदीपने शेअर केला रोमँटीक फोटो आणि व्हिडीओ

सई लोकूर सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरीही ती सोशल मिडीयावर चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात असते.

सईने गुरुवारी काहीच तासांपुर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिच्यासोबत तिचा नवरा तिर्थदीप रॉय दिसत आहे. सईच्या हातात प्रेग्नन्सी कीट असुन तिने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय

गुड न्युज देताना सई म्हणाली...

"हाताची दहा लहान बोटे आणि आमचे कुटुंब तुमच्या प्रेमाने वाढते आहे... आम्‍हाला तुम्‍हाला कळवण्‍यास अत्‍यंत छान वाटत आहे की, आमच्या आनंदाचा एक मौल्यवान बंडल लवकरच येणार आहे.. तुमच्या प्रेमाने, हसण्याने आणि आनंदाने आमचं आयुष्य भरून टाका!" अशा भावना सईने व्यक्त केल्या आहेत.

लग्नानंतर इतक्या वर्षांनी दिली गुड न्युज

सई आणि तिर्थदीप हे नवरा बायको लवकरच त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करणार आहेत. पांढर्‍या परीटेल गाऊनमध्ये सई सुंदर दिसत आहे आणि तिचा बेबी बंप एकदम दिसत आहे.

सई आता लवकरच आई होण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तिची उत्सुकता सुरू आहे..

सई आणि तिर्थदीप या दोघांनी २९ नोव्हेंबर २०२० ला लग्न केलं. लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघांच्या आयुष्यात ही गुड न्युज आल्याने दोघे नवरा बायको आनंदी असतील यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT