Sai Tamhankar new The Saree Story
Sai Tamhankar new The Saree Story 
मनोरंजन

सई ताम्हणकरची ‘द सारी स्टोरी’ पाहिली आहे ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्वात आपला ठसा उमटिवल्यानंतर तिने  आता उद्योगक्षेत्रात पाउल टाकण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तिने हे पाऊल टाकले आहे. यासाठी सई ताम्हणकरने आपल्या स्वत:चे ‘द सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे. 

सई ताम्हणकरने आजवर अनेक यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. मग ते मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूड आणि फॅशन दुनियेत तिने कमावलेलं नाव असेल किंवा स्वत:ची एक कुस्ती टीम असणं. सईने नेहमीच वेगळी वाट निवडली आहे. आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘द सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. सईच्या चाहत्यांना  यानिमीत्ताने सईच्या निवडीच्या साड्या परिधान करण्याची संधी आहे. 

आपली कॉलेजपासूनची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत सईने हे लेबल लाँच केले आहे. सई ताम्हणकर म्हणते, “कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण दोघी मिळून काहीतरी नवीन करूया, असं मला आणि श्रुतीला नेहमी वाटत असे. पण काय नवं ते उमजतं नव्हतं. पूढे आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात करीयर करण्यात गुंतून गेलो. पण 2020 ने आम्हांला नव्या कल्पनांवर विचार करायची संधी दिली. आणि आता  ‘दि सारी स्टोरी’ने आमचं स्वप्न आकाराला येतंय.”

‘द सारी स्टोरी’मध्ये ‘सई टच’ काय असेल असं विचारल्यावर सई सांगते, “माझ्या सिनेमा आणि भूमिकांबाबत जशी मी चोखंदळ आहे ना, अगदी तशीच साड्यांबाबतही आहे. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन ह्यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT