Sai Tamhankar New post viral, kranti redkar comment,India Lockdown movie  instagram
मनोरंजन

Sai Tamhankar: 'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

सई ताम्हणकर सध्या तिच्या एका फोटो पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे. तर त्या फोटोवर अभिनेत्री क्रांती रेडकरनं केलेल्या कमेंटने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

प्रणाली मोरे

Sai Tamhankar: सई ताम्हणकर सध्या तिच्या एका पोस्टमुळे भलतीच चर्चेत आहे. त्या फोटोत ती कोणाशी तरी बोलते आहे,ती व्यक्ती पाठमोरी उभी आहे. अंदाज लावला जातोय हा एक अभिनेता आहे,ज्याच्याशी बोलताना सईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. खरी गम्मत पोस्टपेक्षा ,या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये आहे. (Sai Tamhankar New post viral, kranti redkar comment,India Lockdown movie )

सईनं त्या अभिनेत्यासोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की, ''रिअलवाला कॅन्डीड,ओळखा पाहू कोण?'' आता सईच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. त्यात क्रांतीनं चक्क लिहिलं आहे,'मी लगेच ओळखलं तू कोणाशी बोलतेयस,आपण याविषयी खूप आधी बोललो होतो, तुझ्या डोळ्यातील चमकच सांगतेय तु त्याच्याशीच बोलतेयस'.

आता या फोटोवर इतरही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत पण क्रांंतीची ही कमेंट सर्वात अधिक लक्षवेधी ठरत आहे. आता माहितीसाठी सांगतो की सई त्या फोटोत प्रतिक बब्बरशी बोलत आहे. जो स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा असण्यासोबतच बॉलीवूडचा उत्तम अभिनेता आहे. आणि क्रांतीच्या कमेंटवरनं एव्हाना लक्षात आलंच असेल की सईला प्रतिक प्रचंड आवडत असणार.

फोटो संदर्भात थोडक्यात माहिती द्यायची तर हा फोटो सईच्या आगामी 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान क्लीक केला गेला आहे. मधूर भांडारकर दिग्दर्शित या सिनेमात सई ताम्हणकर प्रतिक बब्बर सोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचं एक पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. सिनेमाच्या पोस्टरवरील सईचा लूक मात्र चाहत्यांना खटकला अन् त्यांनी मराठी कलाकार नेहमी मोलकरणीच्या भूमिकाच का करतात असा सवाल सिनेमा न पाहताच विचारायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT