Sai Tamhankar Instagram
मनोरंजन

सई ताम्हणकर झालीय हैराण; इलाज नाही म्हणतेय

मराठी सिनेइंडस्ट्री सोबतच सई ताम्हणकरने बॉलीवूडमध्येही आपली ओळख बनवली आहे.

प्रणाली मोरे

सई ताम्हणकर(Sai Tamhankar) म्हणजे मराठी सिनेइंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस चेहरा. हॉट सई ताम्हणकरने आपल्या परफॉर्मन्सेसच्या जोरावर मराठीत नाव कमावलं अन् सोबत बॉलीवूडमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठीत 'दुनियादारी','वजनदार','क्लासमेट्स','पुणे ५२','बीपी','धुरळा' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे केल्यानंतर हिंदीतही तिनं 'हंटर','गझनी','मीमी' अशा सिनेमातून आपली ओळख निर्माण केली. आज मराठीसोबत बॉलीवूडमध्येही ती व्यस्त आहे. नुकताच तिचा 'पॉंडिचेरी' हा सिनेमा प्रदर्शित झाला अन् त्यातील तिच्या भूमिकेचं कौतूकही करण्यात आलं.

'पॉंडिचेरी' सिनेमात सईनं टूर गाईड म्हणून व्यक्तिरेखा साकारली आहे. 'पॉंडिचेरी' हा कोरोनाचे निर्बंध थोडे शिथिल झाल्यानंतर सिनेमागृहात प्रदर्शित झालेला सईचा पहिला मराठी सिनेमा.२५ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज झाला होता. 'पॉंडिचेरी' सिनेमा आयफोनवर शूट करण्यात आला आहे. तेही कोणत्याही असिस्टंटच्या मदतीशिवाय. याच सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेसंदर्भात बोलताना तिनं स्वतःविषयीच्या काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे.

ती म्हणाली आहे,''पॉंडिचेरी सिनेमातील टूर गाईड ज्या स्वभावाची आहे त्यापेक्षा मी पूर्णतः वेगळी आहे. पॉंडिचेरी मधील मी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेमाच्या बाबतीत थोडी निरस आहे,पण ताम्हणकर सई मात्र प्रेमात सहज पडते,अगदी जराही वेळ मला लागत नाही. पण माझ्या त्या स्वभावामुळे मला स्वतःचाच खूप राग येतो. मी असं कसं सहज प्रेमात पडू शकते हे माझं मलाच कळंत नाही आणि मग पुढे जाऊन काही बिनसलं की त्या घाईगडबडीतल्या निर्णयाचा मी राग-राग करू लागते. पण यावर काही औषध नाही. मी अशीच आहे''. सई ताम्हणकरनं २०१३ मध्ये प्रेमात पडून पुणे स्थित अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. २०१५ मध्ये सई आणि अमेय एकमेकांपासून विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT