Bharat Jadhav
Bharat Jadhav  esakal
मनोरंजन

Natya Mahotsav : चित्रपटात काम करताना मर्यादा येतात, पण..; काय म्हणाले अभिनेते भरत जाधव?

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : नाटक थेट लोकांच्या मनाशी भिडते, त्यामुळे नाटकं श्रेष्ठच आहेत. नाटक पाहायला येणाऱ्यांची गर्दी कशी वाढेल, ही चळवळ महत्त्वाची आहे. त्या चळवळीला ताकद देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने आयोजिलेला नाट्यमहोत्सवही तितकाच महत्त्वाचा अन् प्रशंसनीय आहे. त्यामुळे चळवळीला निश्‍चित उभारी मिळेल, असा विश्‍वास ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव (Actor Bharat Jadhav) यांनी व्यक्त केला.

दै. ‘सकाळ’तर्फे येथे आयोजित नाट्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘सकाळ कॉफी विथ कलाकार’ कार्यक्रम येथे झाला. त्यात अभिनेते जाधव बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, अभिनेते कमलाकर सातपुते, ऐश्‍वर्या शिंदे, चितळे डेअरीचे मार्केटिंगचे प्रमुख निवास गुरव, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटीचे संदीप डाकवे, यशवंत बँकेचे शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘‘नाट्यचळवळ ही चळवळच आहे. त्या चळवळीला दिशा देण्यापेक्षा नाटकाला लोक कशी येतील, यावर फोकस ठेवून काम झाले पाहिजे. त्यासाठी ती चळवळ महत्त्वाची आहे. ‘सकाळ’ माध्यम समूह ज्या पद्धतीने त्यासाठी उभा राहिले आहे, तेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’सोबत प्रायोजक आले आहेत, त्यांनीही दिलेली साथही महत्त्वाची आहे.

सकाळ नाट्यमहोत्सवामुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. त्याचा अनुभव कोल्हापूर व सांगली येथे घेतला आहे. त्यामुळे नाट्यमहोत्सव यशस्वी होतो आहे. अभिनयात आपले काम आपण फोकस केले पाहिजे. काम करत करत आपला फोकस यशस्वी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. चित्रपटांपेक्षा नाटक अधिक ताकदीचे प्रभावी माध्यम आहे.'

'नाटकात थेट अभिनय आहे, तो प्रेक्षकांशी भिडतो. त्यामुळे नाटक बरंच काही शिकवून जाते. चित्रपटाच्या मर्यादा स्पष्ट आहेत. त्याउलट नाटकात वेगळेपणाही जपता येतो. नाटकांमध्ये संहितेच्या पातळीवर बदल होतो आहे. मात्र, रंगमंचावरील बदलासाठी तेवढा प्रेक्षकवर्ग अपेक्षित आहे. तो मिळत नाही. देशात मराठी रंगभूमी ताकदीचीच आहे. त्यानंतर बंगालच्या रंगभूमीचा उल्लेख होतो.'

जाधव म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडेंपासून वि. वा. शिरवाडकरांसह आत्तापर्यंत अनेक ताकदीचे लेखक झाले आहेत. त्यांची नाटकं अजरामर झाली आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होत आहे. नव्या लेखकांची व कलाकारांचीही होणारी वाढ महत्त्वाची आहे. अनेक नाटकांत तांत्रिक बदल झाले आहेत. मात्र, तरी अभियानाच्या बाबतीत मराठी रंगभूमीच उजवी ठरते. त्यामुळे रंगमंचावर सादरीकरण करताना खूप समाधान मिळते.

'तरुण पिढी नाटक बघायला येते आहे. मात्र, संहिता व त्यांची अभिरुची तितकीच महत्त्वाची आहे. सोशल मीडियासह अनेक माध्यमे खुली असली तरी त्यांच्या खुल्यापणावर मर्यादा आहेत. काही काळाने त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे नाटकाकडे वळण्याचा प्रवाह कायम वाढता आहे. तो कमी-जास्त होतो आहे, त्यालाही बरीच कारणे आहेत. नाटकाला कित्येक वर्षांची परंपरा आहे. चित्रपटात काम करताना मर्यादा आहेत. त्यामुळे नाटकांची पूर्वापार चालत आलेली परंपरा कायम राहण्यासाठी रसिक येतातच. नवा रसिक नाटकाकडे येतो आहे.'

भरत जाधव, अंकुश चौधरी व केदार शिंदे याची मैत्री निश्‍चित आहे. नाटकावरून आमच्यात वैचारिक चर्चा होते. ती व्हावी, त्याशिवाय प्रगती नाही. ग्रुपने किती ताकदीने विषय मांडता, यावर त्याचे सादरीकरण अवलंबून असते. तोच प्रयत्न आम्ही करतो. सध्या अनेक माध्यमे असल्याने नवी पिढी त्यात रमत असली तरी त्याही माध्यमांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. त्यामुळे त्यानंतर तीच युवा पिढी नाटकांकडे वळते आहे, असेच दिसते, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT