Salman Khan Bollywood actor Saba Qamar Pakistani  esakal
मनोरंजन

Saba Qamar : 'तुम्ही सलमानला एवढा भाव का देता? पाकिस्तानी अभिनेत्रीनं डिवचलं'!

जग सांगणार का तुम्हाला तुम्ही काय क्षमतेचे आहात ते....काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील त्या अभिनेत्रीच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan bollywood actor Saba Qamar pakistani actress : जग सांगणार का तुम्हाला तुम्ही काय क्षमतेचे आहात ते....काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील त्या अभिनेत्रीच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्या वेगळ्या अंदाजासाठी आणि अदांसाठी चर्चेत असणाऱ्या सबा कमरनं आता बॉलीवूडची छेड काढली आहे. ती बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

सबा ही काही दिवसांपूर्वी क्रुझवर पार्टी करताना दिसली होती. बाईक राईड करत तिनं शेयर केलेला तो व्हिडिओ चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला होता. सोशल मीडियावरील ती तिच्या पोस्टमुळे अनेकदा वादाचे कारण ठरली आहे. पाकिस्तान मनोरंजन विश्वामध्ये सबावर टीका झाली आहे. तिच्यावर अनेकांनी आगपाखडही केली आहे. यासगळ्यात तिनं बॉलीवूडच्या सेलिब्रेटींवर केलेली टीका कित्येकांना खटकली आहे. मुळातच सबानं बॉलीवूडच्या अभिनेत्यांवर बोलण्याची गरजच काय असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे.

Also Read -सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ज्यांनी इरफान खानचा हिंदी मीडियम पाहिला असेल त्यांना सबा कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. २००७ मध्ये आलेल्या जिन्ना नावाच्या शोमध्ये तिनं काम केलं होतं. त्यानंतर २०१० मध्ये दास्तान मालिकेनं देखील चाहत्यांना वेड लावलं होतं. सबा ही पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामध्ये २०१२ मध्ये तिला पाकिस्तानचा सर्वोच्च तमगा ए पाकिस्तान हा पुरस्कारही मिळाला आहे.

सबा ही सतत वादात असलेली सेलिब्रेटी आहे. यापूर्वी देखील तिला तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं सलमान खानवर टीका केलीहोती. तिला त्या मुलाखतीमध्ये सलमान खानवरुन एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला काही कळत नाही का, तो फारच उथळ अभिनेता आहे. तो कुणाचेच ऐकत नाही.सगळं काही स्वताच ठरवतो. त्यामुळे तुम्ही त्याला एवढा भाव का देता असे तिनं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT