salman khan bought new bulletproof car nissan patrol suv amid death threats viral  Esakal
मनोरंजन

Salman Khan: भाईजान घाबरला! जीवे मारण्याच्या धमकी दरम्यान सलमाननं विदेशातुन मागवली बुलेटफ्रूफ कार...

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानला सध्या एकामागून एक धमक्या येत आहेत. अलीकडेच अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला होता.

Vaishali Patil

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खानचा किसी का भाई किसी की जान या ईदला रिलीज होणार आहे. त्याचबरोबर सलमान आणखी एका कारणाने सध्या खुपच चर्चेत आहे. तेो म्हणजे त्याला आलेली जीवे मारण्याची धमकी.

नुकतच सलमानला ईमेल करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी अजूनही बिश्नोई गँग आणि गोल्डी ब्रार यांच्याकडून सलमान खानच्या जीवाला धोका असल्याच सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षिततेत कसलीच कमतरता ठेवु नये या दृष्टीने सर्व प्रर्यंत सुरु आहे.

आता त्याचदरम्यान सलमान खानने नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली असल्याची बातमी समोर आली आहे. त्याने आपल्या ताफ्यात आता Nissan Patrol SUV समावेश करण्यात आला आहे. सध्या ही गाडी वाहन भारतात लाँच करण्यात आलेली नाही. सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सलमान खानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानने Nissan Patrol SUV विदेशातून आयात केली आहे. एसयूव्ही ही दक्षिण आशियाई बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि महागडी गाडी मानली जाते. या बुलेटप्रूफ वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय खास आहे. भाईजानच्या या नवीन पांढऱ्या रंगाच्या गाडीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा तो एका कार्यक्रमात या गाडीत आला होता.

Salman Khan

सलमान खान नुकताच एका कार्यक्रमात पोहोचला. यादरम्यान, तो Nissan Patrol SUV मध्ये दिसला होता, तर त्याच्यासोबत टोयोटा फॉर्च्युनर आणि महिंद्रा बोलेरो निओ सारख्या अनेक गाड्या होत्या. त्याच्या खाजगी सुरक्षेशिवाय मुंबई पोलीस अधिकारी देखील त्याच्यासोबत दिसले.

Salman Khan

Nissan SUV व्यतिरिक्त, सलमान खानकडे Mercedes Benz S-Class, Lexus LX 470, Audi A8, Porsche Cayenne, Range Rover Autobiography, Audi RS7, Mercedes AMG GLE 63 S आणि Mercedes Benz GL-Class देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT