Tiger 3 First Poster Out:  Esakal
मनोरंजन

Tiger 3 First Poster Out: किंग खानचा जवान येताच भाईजाननंही मैदानात! टायगर 3 चा फर्स्ट लूक अन् रिलिज डेट जाहिर

Vaishali Patil

Tiger 3 First Poster Out: गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा त्याच्या बाल्ड लूकसाठी चर्चेत आहे. त्यातच त्याचे चाहते त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3' आतुरतेने वाट पाहत आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पाहण्यासाठी ते उत्सूक आहे.

त्यातच आता निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी अपडेट दिली आहे. निर्मात्यांनी शनिवारी सकाळी 'टायगर 3' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिखही सांगितली आहे.

सलमान खानने स्वता त्याच्या सोशल मीडिया हँडलवर टायगर 3 चे फर्स्ट लूक पोस्टर शेयर केले आहे. या पोस्टर सोबतच त्याने चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे.

सलमान खानने ट्विटमध्ये पोस्ट शेयर करत लिहिले की, "आ रहा हूं! दिवाळी 2023 ला येतोय टायगर 3. यंदाची दिवाळी YRF50 सह टायगर 3 मोठ्या स्क्रीनवर साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज."

या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना दोघांच्या हातात बंदूक आहे. दोघेही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. हा टायगर सिरिजचा तिसरा भाग आहे.

तर अभिनेत्रीने कतरिनानेही अलीकडेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टर शेअर करून कॅप्शन दिले आहे, "मर्यादा नाही. भीती नाही. मागे वळून बघायचं नाही " या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये #Tiger3. "

'टायगर 3' हा लोकप्रिय 'वायआरएफ स्पाय युनिव्हर्स'चा पाचवा चित्रपट आहे आणि सहा वर्षांनंतर सलमान आणि कतरिना टायगर आणि झोयाच्या भूमिकेत कमबॅक करत आहेत.

2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' या फ्रेंचाइजीचा पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटात सलमान रॉ एजंट टायगरच्या भुमिकेत तर कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत दाखवण्यात दिसली होती.

यानंतर सलमान आणि कतरिनाने 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या सिक्वेलद्वारे पुनरागमन केले. हा भागही खुपच लोकप्रिय ठरला. त्यामुळे आता 'टायगर 3' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT