मनोरंजन

टायगर 3 मधला हा अभिनेता कोण? ओळखा पाहू

- बॉलीवूडमध्ये महागड्या चित्रपटांची काही कमी नाही. वेगवेगळ्या निर्मात्यांनी आतापर्यत अनेक महागडे चित्रपट बनवले आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये महागड्या चित्रपटांची काही कमी नाही. वेगवेगळ्या निर्मात्यांनी आतापर्यत अनेक महागडे चित्रपट बनवले आहेत. मात्र ते बॉक्स ऑफिसवर चालले हे आपण बिनधास्तपणे सांगू शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे त्यातील आशय. अनेकदा रटाळ कथानकानं त्या चित्रपटाची रंगतदार कमी झालेली दिसते. संवाद, पटकथा, सिनेमॅटोग्राफी या सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. मात्र याला काही अपवादही आहेत. सध्या टायगर ३ च्या एका पोस्टरची चर्चा होताना दिसते आहे. त्याला सोशल मीडियावरून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. नव्यानं व्हायरल झालेल्या त्या पोस्टरमधील तो अभिनेता कोण आहे, याचीच चर्चा सर्वात जास्त रंगली आहे.

साधारण अकरा वर्षांपूर्वी यशराज बॅनरनं बँड बाजा बरात काढला. त्याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले होते. ते आता बॉलीवूडमधील सर्वात महागडी फिल्म तयार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या यशराज बॅनरमधील सर्वात महागडी फिल्म असल्याचेही त्यांनी सांगितले होते. लेडिज वर्सेस रिकी बहल, शुद्ध देसी रोमान्स आणि फॅन दिग्दर्शित मनीष शर्मा आता आपली पाचवी फिल्म ही लवकरच प्रेक्षकांसमोर आणणार आहे. त्या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. मनीष शर्मा यांचा हा पाचवा चित्रपट आहे. सध्या ते आपल्या टायगर ३ च्या टीमसोबत पीट्सबर्गमध्ये आहे. त्या मुव्हीमध्ये सलमान खान आणि कॅटरीना कैफ हे दोघे कलाकार आहेत. आज त्यांच्या या नव्या चित्रपटाचा एक लुक समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरु झालीय.

मनीष शर्मा यांनी पहिल्यांदाच टायगर सीरिजमधील चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्धार केला आहे. साधारण नऊ वर्षांपूर्वी हे चित्रपट दिग्दर्शक कबीर खान याने केले होते. कबीर खानचा पहिला चित्रपट एक था टायगर या चित्रपटानं ३२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता टायगर तीनची निर्मिती केली जातेय. त्याचे बजेट ३५० कोटी रुपयांचे असल्याची चर्चा आहे. म्हणून आतापर्यतच्या टायगर सीरिजमधील हा सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याची चर्चा आहे.

टायगर ३ चे बजेट ३५० कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते आहे. जेव्हा सलमान खान आणि कॅटरिना हे पीटसबर्गला रवाना होत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावेळी टायगर तीनमध्ये इमरान हाश्मी हा व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. इमरान हाश्मीला आतापर्यत पाचवेळा सर्वोत्कृष्ठ खलनायकाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT