Salman Khan Esakal
मनोरंजन

Salman Khan: सलमानला गोल्डी ब्रारनेच दिलीय मारण्याची धमकी? प्रकरणात ब्रिटन कनेक्शन समोर!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सलमान जास्तच चर्चेत आला. त्यांच्या सुरक्षेतही पोलिसांना वाढ केली आहे. सलमानला सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मनाई करण्यात आली आहे. दरम्यान सलमानला आलेला धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याचं नाव धाकडराम बिश्नोई असं आहे.

सलमान खानला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी धाकडराम बिश्नोईला सोमवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायलयाने 7 दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

त्याला रविवारी जोधपूर येथून अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने न्यायलायसमोर चुकी मान्य करत मेल चुकून पाठवण्यात आल्याचं आरोपींनी सुनावणीदरम्यान सांगितलं ईमेलमध्ये धाकडने हा ईमेल गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास सहकारी गोल्डी ब्रारच्या वतीने पाठवला असल्याचंही म्हंटले होते.

सलमानला धमकी मिळाल्यानंतर सर्वात पहिले संशयाची सूई ही गँगस्टर बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यावरच होती. यापुर्वी गँगस्टर बिश्नोईने सांगितले होते की, सलमान खानला संपवणे हे माझे उद्दिष्ट होते, त्यानंतर धाकडरामने धमकीचे पत्र पाठवले. त्यामुळे बिश्नोई गँग आणि बिश्नोई टोळीचा तसच गोल्डी ब्रार यामध्ये काही कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहे.

आता या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. सलमान खानला 18 मार्च रोजी पाठवण्यात आलेला धमकीचा ई-मेल गोल्डी ब्रारने पाठवला होता असा संशय आता पोलिसांना आहे. गोल्डी ब्रार हा सध्या यूकेमध्ये लपून बसला आहे.

आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कायदेशीर पद्धतीनं यूके सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. असल्याची बातमी समोर आली आहे. या पत्रामध्ये, ज्या ठिकाणाहून हा ईमेल पाठवला होता तिथला आयपी अॅड्रेसचाही उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामुळे आता याप्रकरणात ब्रिटन सरकारही हस्तक्षेप करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांचा ह संशय खरा ठरल्यास गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT