Salman-Arpita 
मनोरंजन

अर्पिताने सलमानला दिलं सगळ्यात स्पेशल 'बर्थडे गिफ्ट'!

सकाळ डिजिटल टीम

'दबंग खान', 'भाईजान' अशी बिरुदं मिरवणाऱ्या सलमान खानचा आज 54 वाढदिवस. हा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या उत्साहात साजरे करत आहेत. मात्र, आता सलमान आणि त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. 

याचे खास कारण म्हणजे, सलमानची बहिण अर्पिताला कन्यारत्न झाले आहे. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली आहे. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांना अहिल नावाचा एक मुलगा आहे. अर्पिताला झालेल्या कन्यारत्नाचं नाव आयत असं ठेवण्यात आलं आहे. 

अर्पिताने तिच्या भाईजानला वाढदिवसाच्या दिवशी हे खास गिफ्ट दिल्याने वाढदिवसाचा माहोलच पूर्ण बदलला आहे. या बाळाच्या येण्यामुळे पूर्ण खान आणि शर्मा कुटुंब आनंदाने न्हाऊन निघालेलं पाहायला मिळालं. 

सलमानचा वाढदिवस काल रात्री घरगुती पद्धतीने साजरा केल्यानंतर अर्पिताला आज सकाळी 8 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अर्पिताचा पती आयुष आणि कुटुंबातील सर्व प्रमुख मंडळी त्याठिकाणी हजर होते. मुलगी झाल्यानंतर आयुष आणि अर्पिताने सर्व चाहते आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, अर्पिता प्रेग्नंट असल्यामुळे भाईजान सलमान खानने त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा न करता त्याचा भाऊ सोहेलच्या वांद्रे येथील घरी साजरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्याने आपला वाढदिवस कुटुंबियांसोबतच साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT