salman want to marry juhi chawala but her father refuses proposal 
मनोरंजन

'जुहीबरोबर लग्न करण्याची होती इच्छा,तिच्या वडिलांनी दिला नकार' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा स्टार अभिनेता सलमान खानच्या लग्नाचा विषय हा नेहमीच हॉट टॉपिक असतो. वयाची पन्नाशी पार केलेल्या सलमानने अद्याप लग्न केलेलं नाही. त्यावरुन अनेक अफवा मोठ्या गंमतीने त्याचे चाहते एँजोय करत असतात. आतापर्यत बॉलीवूडमधल्या कित्येक अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले आहे. मात्र त्यातील कुणाशीही त्यानं लग्न केलेलं नाही.

सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात आपण एका बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्रीच्या वडिलांकडे त्याने त्या अभिनेत्रीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रत्यक्षात ते लग्न झाले नाही. ती अभिनेत्री म्हणजे प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला. सलमानने याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

सलमानने एका जुन्या मुलाखतीतून आपल्या लग्नाविषयी खुलासा केला होता. तो म्हणाला, जुही खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे. मी तिच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला. आता त्यांनी मला नकार का दिला याचे कारण मला काही समजले नाही. मी यावर विचार केला असता मला असे वाटते की, कदाचित त्यांना मी  वाटलो नसणार. यासाठी त्यांनी माझा आणि जुहीचा प्रस्ताव नाकारला. 

बॉलीवूडमध्ये आपले सौंदर्य आणि अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून जुहीचे नाव घ्यावे लागेल. 90 च्या दशकात ती टॉपची अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा एक सरस असे चित्रपट दिले. यावेळी तिचेही काही अभिनेत्यांशी नाव जोडले गेले होते. मात्र तिनं १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं.

आपल्या लग्नाबद्दल कुणाला कळाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या करिअरवप होईल अशी भीती जुहीला होती. यासाठी तिने गुपचूप लग्न केल्याची कबुली एका मुलाखतीत दिली. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT