sam bahadur movie review  Esakal
मनोरंजन

Sam Bahadur Review: विकी कौशलचा 'सॅम बहादुर' कसा आहे? सिनेमा पाहायचा प्लॅन करण्याआधी वाचा रिव्ह्यू

विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमा कसा आहे? क्लिक करुन जाणून घ्या

Devendra Jadhav

Sam Bahadur Movie Review:

विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. इंडीयन आर्मीसाठी स्वतःचं सर्वस्व झोकून देणारे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा. गेल्या वर्षभरापासून सिनेमाची उत्सुकता शिगेला.

अखेर सॅम बहादुर पाहण्यात आला. कसा आहे सिनेमा? थिएटरमध्ये पाहण्यायोग्य आहे का? विकी कौशलचा अभिनय कसा आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यासाठी हा Review वाचा.

(sam bahadur movie review)

'सॅम बहादुर' सिनेमाची गोष्ट सुरू होते त्यांच्या लहानपणापासून. लहानपणी पाळण्यात असताना त्यांना सॅम नाव कसं पडलं, आणि आर्मीत असताना सॅम 'माणेकशॉ'चे सॅम 'बहादुर' कसे झाले याची गोष्ट सुरुवातीलाच पाहायला मिळते. विकी कौशलची सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतली एन्ट्री चांगली आहे.

पुढे मग मोठ्या पडद्यावर माणेकशॉ यांचं आयुष्य दिसतं. सुरुवातीच्या काळात बेशिस्त वर्तवणुकीमुळे ज्यांचे अधिकार काढून घेतले तेच सॅम माणेकशॉ पुढे भारतीय सैन्याचे फील्ड मार्शल कसे झाले त्याचा संपूर्ण प्रवास सॅम बहादुर सिनेमात पाहायला मिळतो.

सिनेमा चांगला झालाय की गंडलाय? हे प्रेक्षक म्हणून तुम्ही ठरवालच, पण एकदा पाहण्यासारखा नक्कीच झालाय हे नक्कीच सांगू शकतो. मुळात सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यात असा संघर्षाचा काळ नाही. मेहनत, हुशारी आणि धाडसाच्या जोरावर माणेकशॉ भारतीय सैन्यात यशाची एकएक पायरी चढत गेले. त्यांच्या कारकीर्दीचा खरा कसोटीचा काळ होता 1971 चा. त्यादरम्यान एकीकडे बांगलादेश निर्मितीचा विषय पेटू लागला होता तर दुसरीकडे भारत - पाकिस्तान युद्धाचं बिगुल वाजलं होतं. पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. त्या काळात इंदिरा आणि माणेकशॉ यांनी घेतलेले धाडसी निर्णय पुढे भारतासाठी किती महत्वाचे होते याची जाणीव सिनेमा पाहून होते.

संकटाच्या काळात खंबीर राहून नेतृत्व करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या विचारांवर आणि निर्णयावर किती ठाम असता यावर पुढील परिणाम आधारित असतात. सॅम बहादुर मध्ये माणेकशॉ यांची हीच बाजू आपल्याला कळते.

आता थोडं सॅम बहादुरच्या आणखी खोलात शिरू.. सॅम बहादुरच्या दिग्दर्शनात मेघना गुलजार यांनी कमाल केलीय. विकीच्या एन्ट्रीपासूनच सिनेमात माणेकशॉ असल्याचा भास होतो, इतकं प्रभावी दिग्दर्शन मेघना यांनी केलंय. अर्थात यात विकीच्या अभिनयाचं योगदान आहेच. त्यावर नंतर येतो. तर मुद्दा असा की, मेघना यांचा सखोल अभ्यास सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये बघायला मिळतो. आजवर आपण सिनेमांमध्ये भारत - पाकिस्तान फाळणीचं हृदयद्रावक चित्रण पाहिलंय. पण या फाळणीच्या वेळी इंडीयन आर्मीची काय मनस्थिती होती हे दिसून येतं. याशिवाय सिनेमातले युद्धप्रसंग सुद्धा चांगले चित्रित करण्यात आले आहे.

आणखी एक गोष्ट मेघना गुलझार यांची सांगावीशी वाटते ते म्हणजे, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सॅम माणेकशॉ यांचं मैत्रीपूर्ण नातं खूप सुरेख दाखवलंय. कारण इंदिराजी आणि माणेकशॉ यांच्या खेळकर संबंधांच्या चित्रणात जरा काही उन्निस- बिस झालं असतं तर प्रेक्षकांना ते वेगळं दिसलं असतं. त्यामुळे मेघना यांनी त्याचं पुरेपूर भान ठेवलंय, त्याचं कौतुक. माणेकशॉ हे विचारांनी, बुद्धिमत्तेने किती प्रगल्भ होते, हे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात मेघना नक्कीच यशस्वी झाल्या आहेत.

आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अभिनय. सॅम बहादुर सिनेमा चांगला आहेच पण सिनेमाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलंय विकी कौशलने. विकीने सॅम माणेकशॉ यांची भूमिका अक्षरशः जगली आहे. पहिल्या फ्रेमपासुनच विकी हुबेहूब माणेकशॉ वाटतो. त्याचं बोलणं, आवाज, संवादफेक, डोळे, हावभाव, फिटनेस अशा अनेक गोष्टींमधून त्याने माणेकशॉ यांचं व्यक्तिमत्त्व स्वतःमध्ये किती आत्मसात केलंय याचा अनुभव येतो.

सिनेमातलं सरप्राइज पॅकेज म्हणजे, फातिमा साना शेख. इंदिरा गांधींच्या भूमिकेत तिने सुंदर काम केलंय. माणेकशॉ आणि इंदिराजी यांचे प्रसंग रंगतदार होण्यात विकी - फातिमाच्या अभिनयाचं मोठं योगदान आहे. सान्या मल्होत्रा, मोहम्मद झिशान आणि सिनेमातले इतर कलाकार सुद्धा भूमिकेबरहुकुम काम करतात. छोट्याशा भूमिकेत मराठमोळे अभिनेते उदय सबनीस सुद्धा लक्षात राहतात.

तर हा Review शेवटपर्यंत वाचणाऱ्या मित्रांनो - मैत्रिणींनो लिखाणाची सांगता करताना इतकंच म्हणेल, आपल्या देशात महान माणसं होऊन गेली आहेत. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संपूर्ण भारतवासियांचं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केले. माणेकशॉ अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक. सॅम बहादुर सिनेमा म्हणून महत्वाचा आहे कारण, तो सध्याच्या पिढीला नकळतपणे एक आरसा दाखवतो. त्यामुळे विकी कौशलच्या अभिनयासाठी, मेघना गुलझार यांच्या दिग्दर्शनासाठी आणि लास्ट अँड नोट लॉस्ट म्हणजे सॅम माणेकशॉ यांच्या विद्वान प्रतिभेचा अनुभव घेण्यासाठी सॅम बहादुर सिनेमा आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहावाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT