Sam Bahadur box office collection day 5  esakal
मनोरंजन

Sam Bahadur collection Day 5 : कलेक्शन कमी असलं म्हणून काय झालं, प्रेक्षकांनी कडकडीत 'सॅल्युट' ठोकलाय!

लवार, राझी सारख्या वेगळ्या कलाकृती तयार करुन आपली वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात तयार करणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार या सध्या चर्चेत आहेत.

युगंधर ताजणे

Sam Bahadur box office collection day 5 : तलवार, राझी सारख्या वेगळ्या कलाकृती तयार करुन आपली वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात तयार करणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार या सध्या चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांचा सॅम बहादूर नावाचा चित्रपट. या चित्रपटानं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादूर नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. भलेही एकीकडे प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल प्रदर्शित झाला असला तरी सॅमनं देखील प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. एकाच वेळी हे दोन्ही चित्रपट एकमेकांसमोर आले. मात्र त्यांचे विषय वेगळे आहेत. संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे.

सॅम बहादूरनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. विकी कौशलनं सॅम माणेकशॉ यांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या खास कौतुकाचा विषय आहे. त्या भूमिकेसाठी त्यानं घेतलेली मेहनत, खास प्रशिक्षण यामुळे तो प्रतिक्रियेचा विषयही आहे. रणबीरची अॅनिमल मधील भूमिका आणि विकीची सॅम बहादूरमधील भूमिका याची तुलना होत असून प्रेक्षकांनी विकीच्या भूमिकेला दाद दिली आहे. त्याची प्रशंसा केली आहे.

अॅनिमलच्या तुलनेत सॅम बहादूरला बऱ्याच अंशी कलेक्शनच्या बाबत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अॅनिमलच्या शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे. सॅम बहादूरला तेवढा प्रतिसाद नाही. त्यामुळे त्यानं सावकाश सुरुवात करत आपले स्थान कायम राखले आहे. एकीकडे अॅनिमलनं २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून दुसरीकडे सॅम बहादूरनं आता पर्यत ३२.५५ कोटी कमावले आहेत.

विकीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. त्याविषयी वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील विकीचे कौतुक करत नव्या पिढीला हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. एक डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलची जोरदार फाईट आहे.

विकी सोबत या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. अॅनिमलच्या प्रचंड प्रतिसादापुढे सॅम बहादूर काहीसा झाकोळला गेला आहे. मात्र येत्या काही दिवसांत तो चांगली कमाई करेल असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT