Samantha About her divorce with Naga Chaitanya Instagram
मनोरंजन

Samantha: 'मी जर बोलले तर मी अडचणीत येऊ शकते..',नागाचैतन्य सोबतच्या घटस्फोटावर समंथाचं मोठं वक्तव्य

नागाचैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथानं चुप्पी साधली होती पण गेल्या काही दिवसांत तिनं घटस्फोटाविषयी बऱ्याच गोष्टी स्पष्ट बोलल्याचं समोर आलं आहे.

प्रणाली मोरे

Samantha About her divorce with Naga Chaitanya: साऊथ ब्युटी समंथाचा नागाचैतन्यासोबत झालेला घटस्फोट खूपच गाजला. या घटस्फोटानं समंथाचं वैयक्तिक आयुष्य हलवून सोडलं होतं. तिनं भावनिक पातळीवर अनेक आघात यानंतर सहन केले.

समंथा आणि नागाचैतन्यनं त्यांच्या घटस्फोटासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. दोघांनी एकत्रितपणे एक स्टेटमेंट ऑक्टोबर २०२१ मध्ये पब्लिश केलं होतं. आता समंथा आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. त्यामुळे इतके दिवस घटस्फोटावर बोलणं टाळत असणारी समंथा आता हळूहळून यावर मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. आपल्या घटस्फोटासंबंधातील गोष्टी विसरण्यासारख्या नाहीत असं नुकतच या 'शाकुंतलम' फेम अभिनेत्रीनं म्हटलं आहे.

एका मुलाखतीत तिला नुकताच प्रश्न विचारला गेला की तिच्या आयुष्यातील अशी एखादी गोष्ट कोणती आहे जी तिला विस्मरणात न्यायची आहे.

त्यानंतर समंथा म्हणाली, ''तुम्ही हा प्रश्न माझ्या रिलेशनशीपविषयी विचारला आहे का?'' जेव्हा तिला सांगितलं की तुला जो अर्थ लावून बोलायला आवडेल त्यावर तू व्यक्त होते तेव्हा समंथा म्हणाली,''या प्रश्नाचं उत्तर मला अडचणीत टाकू शकतं''.(Samantha About her divorce with Naga Chaitanya, says,don't want to forget anything)

त्यानंतर समंथा पुढे म्हणाली,''मला आयुष्यात घडलेली कोणतीच गोष्ट विसरायची नाही कारण त्या प्रत्येक गोष्टीनं मला काही ना काही शिकवलं आहे,त्यामुळे मला ठरवूनही काही विसरायचं नाही''.

आणि पटकन समंथा म्हणाली,''ओ गॉड..हे मी स्पष्टपणे व्यक्त होत बोलून गेली खरी पण मला यामुळे कोणतीही अडचण येऊ नये. मी इथेच थांबते..मला या प्रश्नाचं उत्तर यापुढे सविस्तर द्यायचं नाही''.

'' हो पण मला माझ्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण त्या गोष्टींमधून मी खूप काही शिकले आहे''.

काही दिवसांपूर्वीच समंथानं आपल्या आणि नागाचैतन्याच्या घटस्फोटाविषयी मौन सोडलं होतं आणि म्हणाली होती,पुष्पा सिनेमात मी ऊ,अंटावा हे आयटम नंबर करु नये यासाठी मला कुटुंबातून विरोध करण्यात आला होता. करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ चा शोमध्ये समंथानं घटस्फोटाविषयी काही गोष्टी पहिल्यांदा समोर आणल्या होत्या.

काही आठवड्यांपूर्वी एका रिपोर्टच्या आधारे समोर आलं होतं की समंथानं आपला पूर्वाश्रमीचा पती नागाचैतन्य याच्या शोभिता ढुलीपाला सोबतच्या कथित अफेअरवर भाष्य केलं आहे. त्यावेळी शोभिता आणि नागाचैतन्य यांचा एका हॉटेलमधून बाहेर येतानाचा जुना फोटो व्हायरल झाला होता. पण त्यानंतर समंथानं ट्वीटरवर एक स्टेटमेंट शेअर करत म्हटलं होतं की,हे सगळं खोटं आहे,मी कधी असं काही म्हटलेलं नाही.

समंथाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर शाकुंतलम हा समंथाचा सिनेमा १४ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. आणि त्यानंतर लवकरच समंथा सिटाडेल या सीरिजमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT