Samantha Ruth Prabhu esakal
मनोरंजन

Samantha: 'कशी आहेस समंथा'? त्याला राहवलं नाही, विचारपूस केलीच!

आता समंथाचे नाव सगळ्यांना माहिती झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री समंथानं बॉलीवूडच्या चाहत्यांना वेडं केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Samantha Naga Chaitanya love story: आता समंथाचे नाव सगळ्यांना माहिती झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री समंथानं बॉलीवूडच्या चाहत्यांना वेडं केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनमध्ये समंथानं लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यामुळे समंथाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. तिला वेगवेगळे चित्रपटही मिळाले. याचवेळी तिच्या वैयक्तिक जीवनातही मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले.

काही दिवसांपासून समंथाला एका वेगळ्याच आजारानं ग्रासल्याची बातमी व्हायरल झाली होती. संथमाला जडलेल्या मायोसाटोसिस आजारामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यासगळ्यात समंथाचा यशोदा नावाचा चित्रपटही चर्चेत आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याची चर्चा होती. अखेर त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. हे सगळं होत असताना समंथाच्या आजारपणाची माहिती समोर आली आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. समंथा या आजारपणातून बरी होणार की नाही, ती चांगले उपचार घेत आहे की नाही असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहे.

समंथाला एक फोन आला आणि त्याची चर्चा सुरु झाली. त्या फोन करणाऱ्या व्यक्तीनं समंथाची विचारपूस केली. तो फोन दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून समंथानं ज्याच्यासोबत घटस्फोट घेतला त्या नागा चैतन्याचा होता. चैतन्यानं व्यक्त केलेली काळजी चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरताना दिसत आहे. घटस्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर बराच काळ हे कपल चर्चेत होतं. काहीही झालं तरी एकत्र राहायचं नाही असं ठरवून टाकलेल्या या जोडप्याच्या चर्चा पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

येत्या दिवसांत समंथाचा यशोदा नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्तानं तिनं तिला झालेल्या एका आजारपणाविषयी तिनं सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून समंथानं बॉलीवूड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पामध्ये तिनं केलेल्या डान्सचे कौतूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : ९ फूट लांबीच्या अजगराचे थरारक रेस्क्यू; धारावीतील नॅचरल पार्क परिसरात सर्पमित्र पोलिसाची धाडसी कामगिरी

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT