Samantha Ruth Prabhu Instagrm
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu ला शूटिंग दरम्यान भारी पडला अ‍ॅक्शन सीक्वेन्स.. अभिनेत्रीच्या हातांची अवस्था वाईट..

साऊथ स्टार समंथा रुथ प्रभू 'सिटाडेल' सीरिजच्या शूटिंग दरम्यान जखमी झाल्याचा फोटो समोर आल्यानं तिचे चाहते मात्र चिंतेत आहेत.

प्रणाली मोरे

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभू ही साऊथ इंडस्ट्रीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन केले आहे. सध्या अभिनेत्री अमेरिकन सीरीज 'सिटाडेल'च्या हिंदी रीमेकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

त्यातच आता बातमी समोर आली आहे की शूटिंग दरम्यान सेटवर ती जखमी झाली आहे..याविषयीची माहिती स्वतः अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत शेअर केली आहे.

समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. तिथे ती आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से शेअर करताना दिसते.

आता तिनं एक फोटो शेअर केला आहे..ज्यात तिच्या हातावर जखम झालेली दिसत आहे.(Samantha ruth prabhu injured onset of citadel series photo viral )

समंथा रुथ प्रभूनं जो फोटो शेअर केला आहे त्यात तिनं आपले दोन्ही हात दाखवले आहेत. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की तिच्या हाताच्या अंगठ्यावर जखमेचे निशाण दिसत आहेत. तसंच,थोडं खरचटलेलं देखील दिसत आहे.

या फोटोंना पोस्ट करत समंथानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''अॅक्शनची कमाई....''. तिच्या या कॅप्शनवरनं स्पष्ट दिसत आहे की तिला ही जखम अॅक्शन सीक्वेन्स शूट करताना झाली आहे.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

'सिटाडेल' सीरिजचे मूळ निर्माता रुसो ब्रदर्स हे आहेत,ज्यात अभिनेता रिचर्ड मॅडेन,प्रियंका चोप्रा आणि स्टेनली टुस्सी सारखे बडे स्टार्स दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर या सीरिजचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

तर याच्या हिंदी रिमेकविषयी बोलायचं झालं तर त्याला राज आणि डीके बनवत आहेत. या सीरिजमध्ये समंथासोबत वरुण धवनही आहे.

ही एक स्पाय थ्रीलर सीरिज आहे. यात समंथा आणि वरुण दोघेही अॅक्शन अवतारात दिसणार आहेत.

Samantha ruth Prabhu Injured

समंथाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती आपल्याला 'यशोदा' सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिनं एका सरोगेट मदरची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाला होता.

बॉक्सऑफिसवर जवळपास ४० करोड सिनेमानं कमावले होते. तर समंथाचा आगामी सिनेमा 'शकुंतलम' आहे,जो एक मायथोलॉजिक रोमॅंटिक ड्रामा आहे. या सिनेमाची देखील लोक खूप काळापासून वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT