Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu Google
मनोरंजन

समंथाचा पहिला पगार, केला धक्कादायक खुलासा...

प्रणाली मोरे

तेलुगु सुपरस्टार समंथा रुथ प्रभुची(Samantha Ruth Prabhu) आता ओळख करुन द्यायची मुळीच गरज नाही. समंथानं एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे आतापर्यंत केले आहेत आणि आता ती रग्गड पैसाही सिनेमातून कमावत आहे. पण आता करोडोत कमावणाऱ्या समंथाची एकेकाळची कमाई अगदीच सर्वसामान्य होती. चारचौघांप्रमाणेच तिच्या हातात 8 तास काम केल्यावर एक साधारण किमतीचा चेक पडायचा. स्वतः समंथानं याविषयी खुलासा केला आहे.

समंथानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तराचा एक लाइव्ह सेशल घेतला होता. त्याच दरम्यान तिनं चाहत्यांनी विचारेलल्या प्रश्नांना उत्तर देताना आपली पहिली कमाई फक्त ५०० रुपयांची होती असं सांगितलं आहे. एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्स दरम्यान तिनं होस्टेस म्हणून काम केलं होतं तेव्हा तिला तो ५०० रुपयांचा चेक मिळाला होता. तेव्हा समंथा फक्त १० किंवा १२ वी ला आपण होतो असं म्हणाली आहे.

समंथा रुथ प्रभूला आता सिनेइंडस्ट्रीत काम करुन १२ वर्ष झाली आहेत. तिनं २०१० मध्ये नागा चैतन्यसोबत 'ये माया चेसावे' मध्ये काम केलं होतं. या सिनेमानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिनं तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत कत्थी,रंगस्थलम,सन ऑफ सत्यमूर्ती सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. समंथाने मनोज बाजपेयीसोबत 'द फॅमिली मॅन २' या सुपरहिट वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. आणि या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं कौतूकही झालं होतं. तिनं या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलं होतं.

'पुष्पा' सिनेमातील तिच्या 'ऊ अंटावा' या गाण्यामुळे तिची जोरदार चर्चा झाली. या गाण्यात अल्लू अर्जूनसोबत ती थिरकली होती. समंथा आता लवकरच जोडी राज आणि डीके यांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT