Samantha Ruth Prabhu wears burqa In viral video: Esakal
मनोरंजन

Samantha in Burqa: समांथानं का घातला बुरखा? व्हिडिओ व्हायरल! चर्चांना उधाण..

Vaishali Patil

Samantha in Burqa: सध्या मनोरंजन विश्वावर साउथ चित्रपटांचं वर्चस्व आहे मात्र त्याचबरोबर साउथ कललाकारदेखील चर्चेत आहे. त्यातच साउथची सुपरस्टार लेडी म्हणजे समांथाही चर्चेत आहे.

तिचे सध्या सोशल मिडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी समांथाचा 'शाकुंतलम' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. नुकतच तिने हैदराबाद येथे नवीन घर घेतलं असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहेत.

त्यातच आता समांथाचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने बुरखा घातलेला दिसत आहे. आता समांथानं बुरखा का घातला असा सवाल देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे.

त्याच झालं असं की 9 मे रोजी विजय देवरकोंडाचा वाढदिवस होता. मात्र तो सध्या त्याच्या चित्रपटाची शुटिंग करत असल्याने चित्रपटाच्या सेटवरच त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती.

समांथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा लवकरच कुशीमध्ये एकत्र दिसणार आहेत. समांथाचा हा लूक तिच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये टेबलावर एक मोठा केक दिसत आहे आणि विजय केक कापत आहे. त्याला चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांनी घेरले होते. केकवर लिहिलेला मेसेज होता, “विजय देवरकोंडाला वाढदिवसाच्या शुभेच्छा”. मात्र इतक सगळ असतांना या व्हिडिओच विजयकडे लक्ष न जाता समांथाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समांथा यावेळी बुरखा घातलेली दिसली. तिने सर्वांच लक्ष वेधुन घेतलं. विजय देवराकोंडाच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो त्याच्या फॅन पेजने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

यात समांथा रुथ प्रभूने हॅपी बर्थडे गाणंही गात आहे. व्हिडिओमध्ये समांथानं बुरख्याखाली पिवळा सूट घातला आहे. नुकतच निर्मात्यांनी विजयच्या वाढदिवसाच्या चित्रपटाचं पहिले गाणे रिलीज केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग होस्टेलच्या व्यवहारातील २३० कोटींची गोठवा- रविंद्र धंगेकर

Pune Weather Update: पुण्यात पुन्हा सरींचा हल्ला! पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा

Solapur Municipal Corporation: बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करा; आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जनता दरबारात दाद

SCROLL FOR NEXT