Samantha Ruth Prabhu Shaakuntalam movie
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: समंथाला मिळाला पहिला हिंदी चित्रपट, साकारणार 'राजकुमारी'!

समंथाच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते...

सकाळ डिजिटल टीम

Samantha Ruth Prabhu News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतातील आतापर्यतची सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेचे नाव घेतले जाते. या (Indian Web Serise News) मालिकेमुळेच समंथाचा घटस्फोट झाला अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समंथानं फॅमिली मॅनमधून हिंदी प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेतला होता. त्यानंतर ती अल्लु अर्जुनच्या पुष्पामधूनही समोर आली. त्यातील तिच्या नृत्यानं प्रेक्षकांना घायाळ केले होते.

समंथाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे ती आता बॉलीवूडमध्ये येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ती या संधीची वाट पाहत होती. आतापर्यत केवळ वेगवेगळ्या मालिका आणि शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. मात्र समंथानं एका बिग बजेट चित्रपटातून समोर यावं अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांची होती. अखेर समंथाला अशी संधी मिळाल्याचे दिसून आले आहे.

समंथा ही आयुषमान खुराणासोबत एका हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार आहे. त्यासाठी तिला कास्ट करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. नीरने भट्ट यांनी त्याची पटकथा लिहिली आहे. फॅमिली मॅनमुळे समंथाच्या वाट्याला बॉलीवूडची दारं उघडली गेली. असे सांगितले जाते. स्त्री, भेडिया आणि मुंझा यांच्यानंतर मॅडॉक फिल्मस, हॉरर कॉमेडी स्पेसचा हा चौथा चित्रपट आहे. गेल्या दिवसांपासून समंथा ही वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे.

असं म्हटलं जातं की, निर्माता विजाननं आयुषमान खुराणाच्या माध्यमातून समंथाशी संपर्क साधला. समंथा देखील हा हॉरर कॉमेडी स्पेसचा भाग होण्यास तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी समंथा, नयनतारा आणि विजय सेतुपती हे एका चित्रपटातून एकत्र दिसले होते. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

Vijay Hazare Trophy : ८ चौकार, ८ षटकार... रोहित शर्माने झळकावले खणखणीत शतक; ७ वर्षांनी परतला अन् वादळासारखा घोंगावला...

MP Supriya Sule : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, महाविकास आघाडी-राष्ट्रवादीसमवेतच निवडणूक लढण्याचा प्रयत्न

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT